शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 22, 2014 23:24 IST

बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

किशोर वंजारी - नेरबालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले त्यांचे मानधन आजतागायत प्रशासनाने दिले नाही. अथवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्यासाठी प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर ही वेळ येवून ठेपली आहे. यवतमाळ जिल्ह्यात चार हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनिस आहेत. त्यांच्या मेहनतीनेच जिल्ह्यातील अंगणवाड्या सुरळीत सुरू आहे. अल्प मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविका आणि मदतनिस कार्यरत आहे. त्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका या घटस्फोटीत आणि दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या कुटुंबातील आहे. हातावर आणणे आणि पानावर खाने अशी त्यांची परिस्थिती. त्यातही प्रशासनाने गेल्या अनेक वर्षात मानधनात समाधानकारक वाढ केली नाही. असे असतानाही मानधनही सुरळीत दिले जात नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ या तीन महिन्यांचे मानधन अद्यापही अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळाले नाही. दिवाळी हा सण अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. असे असताना प्रशासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळेच अग्रीम तर सोडा साधे मानधनही दिवाळी सणाच्या तोंडावर मिळालेले नाही. मानधन तत्काळ मिळाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विजया सांगळे, सचिव अनिता कुळकर्णी यांनी दिला आहे. मानधनाचा हा प्रश्न मार्गी लागतो का याकडे लक्ष लागले आहे.