शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

यवतमाळातही बनावट नोटा चौघांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 5:00 AM

शहरातून बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग चार दिवस पाळत ठेवली. त्यानंतर पांढरकवडा रोडवरील रचना कॉलनी येथील या टोळीतील चौघांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून २१ हजार ६०० रुपये किमतीच्या २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातून बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग चार दिवस पाळत ठेवली. त्यानंतर पांढरकवडा रोडवरील रचना कॉलनी येथील या टोळीतील चौघांना मंगळवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून २१ हजार ६०० रुपये किमतीच्या २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. सय्यद वसीम सय्यद जमील (२३) रा. बिलालनगर कोहिनूर सोसायटी, वसीम शहा ऊर्फ मुन्ना अहेमद शहा (२७) रा. पाटील ले-आऊट कोहिनूर सोसायटी, दानिश शहा तय्यब शहा (१९) पिग्मी एजंट रा. सुंदरनगर भोसा, साकीब हमीद अकबानी (२१) रा. मेमन कॉलनी यवतमाळ यांना अटक करण्यात आली. या टोळीमध्ये जुने वाहन खरेदी-विक्री करणारा, भाजीपाला विक्री करणारा, पतसंस्थेची वसुली करणारा पिग्मी एजंट, रोजमजुरी करणारा अशा सर्वच घटकांचा समावेश आहे. हे आरोपी शिताफीने बनावट नोटा चलनात वापरत होते. विवेक देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ४८९ (ब) (क), १२० (ब), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ शहर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे. आरोपींनी या नोटा आणल्या कोठून याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, गणेश वनारे, उपनिरीक्षक योगेश रंधे, सागर भारस्कर, जमादार बंडू डांगे, मोहंमद चव्हाण, हरीश राऊत, नीलेश राठोड, विनोद राठोड, सुधीर पिदूरकर, किशोर झेंडेकर, गणेश नाईक, सलमान शेख, मोहंमद भटवाले, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी यांनी केली. दरम्यान, बनावट नोटांचा अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असलेला गुन्हा उघड केला. याबद्दल एसपींनी एलसीबी पथकाला २५ हजारांचे रोख पारितोषिक, सी नोट जाहीर केले. 

चार दिवस होती पाळत - पोलिसांनी सलग चार दिवस पाळत ठेवल्यानंतर मंगळवारी रात्री रचना सोसायटी पांढरकवडा रोड येथे जावून कारवाई केली. त्यांच्याकडून तीन मोबाईल, दोन मोटारसायकली यांसह २०० रुपयांच्या १०८ बनावट नोटा जप्त केल्या. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस