शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

उमरखेड हत्याकांडात आरोपीला मदत करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 5:00 AM

हत्येच्या कारणाचा शोध घेत असताना ४ मे २०१९ रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा धागा पकडून तपास सुरू झाला. त्यावरून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अबरार (२२)  रा. पुसद याच्यावर लक्ष केंद्रित केले. २०१९ मध्ये शेख ऐफाज याचा भाऊ शेख अरबाज याचा उमरखेड येथे रात्री २ वाजता अपघात झाला होता. तेव्हा डॉ. हनुमंत धर्मकारे यांनी उपचारात दुर्लक्ष केल्याने भावाचा मृत्यू झाला असा आरोप करून शेख ऐफाज याने वाद घातला, डॉ. धर्मकारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर डॉ. हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेसाठी जिल्हाभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले. ग्रामीण आरोग्य सुविधा प्रभावित झाली. या दबावात पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू ठेवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या वर्णनाच्या युवकाचा माग काढणे सुरू केले. या हत्याकांडात मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या चौघांना ढाणकी येथून पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी उमरखेड येथे पत्रपरिषदेत दिली. डॉ. हनुमंत संताराम धर्मकारे यांची हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली, यावरच पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. त्यात कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक वाद ही कारणे नसल्याचे पुढे आले. हत्येच्या कारणाचा शोध घेत असताना ४ मे २०१९ रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा धागा पकडून तपास सुरू झाला. त्यावरून मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अबरार (२२)  रा. पुसद याच्यावर लक्ष केंद्रित केले. २०१९ मध्ये शेख ऐफाज याचा भाऊ शेख अरबाज याचा उमरखेड येथे रात्री २ वाजता अपघात झाला होता. तेव्हा डॉ. हनुमंत धर्मकारे यांनी उपचारात दुर्लक्ष केल्याने भावाचा मृत्यू झाला असा आरोप करून शेख ऐफाज याने वाद घातला, डॉ. धर्मकारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचाच वचपा काढण्यासाठी पाळत ठेवून मुख्य आरोपी शेख ऐफाज याने ११ जानेवारी २०२२ ला ४.४५ वाजता गोळ्या झाडून डॉ. धर्मकारे यांची हत्या केली, असे पोलीस तपासातून उघड झाले आहे. डॉक्टरवर गोळीबार करून आरोपी शेख ऐफाज हा ढाणकी येथे पसार झाला.  त्याला आरोपी सय्यद तौसीफ सय्यद खलील (३५), सय्यद मुश्ताक सय्यद खलील (३२), मौहसीन शेख कय्युम (३४), शेख शाहरुख शेख आलम (२७) सर्व रा. ढाणकी यांनी मदत केली. या चौघांच्या मदतीने शेख ऐफाज हा पसार झाला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून शेख ऐफाज याला पसार करण्यासाठी वापरलेले वाहन (एमएच-४-डीएन-६२६३) जप्त केले. या गुन्ह्यात पोलिसांनी कलम १०९, १२० ब, २१२ भारतीय हत्यार कायदा, ॲट्राॅसिटीचे कलम ३ (२) व्हीची वाढ केली. 

पसार आरोपीच्या शोधासाठी दहा पथके- मुख्य आरोपीच्या शोधासाठी दहा पथके तयार करण्यात आली आहे. त्यात उमरखेड, बिटरगाव,पोफाळी, दराटी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल येथील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा ४८ तासांत छडा लावल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक ए. के. धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेशी, उमरखेड ठाणेदार अमोल माळवे, बिटरगाव ठाणेदार, दराटी ठाणेदार, सायबर सेल प्रमुख अमोल पुरी यांच्यासह अंमलदार व इतर कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस, सी नोट, प्लस जीएसटी जाहीर केले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस