काँग्रेसचे माजी आमदार अॅड. अनंतराव देवसरकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 11:56 IST2020-11-26T11:55:26+5:302020-11-26T11:56:13+5:30
Anantrao Deosarkar Death: साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते.

काँग्रेसचे माजी आमदार अॅड. अनंतराव देवसरकर यांचे निधन
यवतमाळ : उमरखेड येथील काँग्रेसचे माजी आमदार अॅड. अनंतराव देवसरकर यंचे गुरुवारी सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.
ते दोन वेळा आमदार होते. साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्थांचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुळगाव चातारी ता. उमरखेड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर, परभणी येथील डॉ. भरत देवसरकर, 3 मुली असा परिवार आहे.