शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उद्घाटकाचा वर्षभरातच पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड गाजले होते.

ठळक मुद्देसाहित्य संमेलन : निमंत्रण नाही, साधा फोनही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षीच्या जानेवारीत यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी सामाजिक भान राखत साहित्यिकांनी जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवेला संमेलनाचे उद्घाटकपद बहाल करून पुरोगामी पाऊल उचलले होते. मात्र वर्षभरातच साहित्यिकांना त्या महिला उद्घाटकाचे विस्मरण झाले आहे. त्यामुळेच सध्या उस्मानाबादेत सुरू असलेल्या ९३ व्या संमेलनासाठी त्यांना निमंत्रण देणे तर दूरच साधा फोनही आला नाही.यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड गाजले होते. शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण महिलांचे खरे प्रश्न खऱ्या पोटतिडकीने मांडणाऱ्या वैशाली येडे यांना यंदा उस्मानाबादच्या मंचावर संधी मिळाली असती तर गेल्या एक वर्षातील प्रचंड वाढलेल्या शेती समस्येवरही त्यांनी जाब विचारला असता. मात्र यंदा त्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. याची येडे यांच्यासह संपूर्ण जिल्हावासीयांना खंत आहे.भेले असन थे...!मांगच्या वर्षी साहित्याच्या स्टेजवरून मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. मांगच्यावेळीच एवढा गजर केला तं यंदा काय गजर करीन असं वाटलं असनं. साहित्यिक लोकं भेले असन...!- वैशाली येडे, ९२ व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक.

टॅग्स :agricultureशेती