शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : ३० एकरातील फुलांनी टाकल्या माना, फुले फेकण्याशिवाय पर्याय नाही

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनामुळे लग्नसराई, सण-उत्सव बंद झाले. अनेकप्रसंगी अनिवार्य असलेल्या फुलांची मागणी घटली. त्यामुळे तालुक्यातील खोपडी येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या ३० एकरातील फुलांनी झाडावरच माना टाकल्या.खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.वाशीम, अमरावती, माहूर, वर्धा आदी ठिकाणी फुले विक्रीकरिता पाठविली जातात. यावर्षी १५ लाख रुपये खर्च करून फुलझाडे लावली. मात्र ऐन हंगामात कोरोनाचे संकट ओढवले. सर्व कार्यक्रम थांबले. परिणामी फुलांच्या मागणीवर परिणाम झाला. संचारबंदीमुळे निर्यातही बंद झाली. दुकान बंद असल्याने विक्री थांबली. त्यामुळे आरेकर कुटुंबाला फटका बसला.जिल्ह्यात एकमेव फुलशेती३० एकर जागेत फुलांची शेती करणारे आरेकर हे जिल्ह्यातील एकमेव शेतकरी कुटुंब आहे. हे कुटुंब यावर्षी कोरोनामुळे अडचणीत आले. झाडावरच फुले सुकली. पर्याय नसल्याने मजूर लावून त्यांनी फुले तोडली व फेकून दिली.

टॅग्स :Socialसामाजिक