जुगार खेळणारे पाच पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 04:50 IST2018-10-25T04:50:14+5:302018-10-25T04:50:25+5:30

जनतेचे रखवालदार असणारे पोलिसच पोलीस ठाण्यात बसून जुगार खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.

Five police gamblers suspended | जुगार खेळणारे पाच पोलीस निलंबित

जुगार खेळणारे पाच पोलीस निलंबित

दारव्हा (जि. यवतमाळ) : जनतेचे रखवालदार असणारे पोलिसच पोलीस ठाण्यात बसून जुगार खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले.
सुमारे महिनाभरापूर्वी हा प्रकार उजेडात आला होता. बंदोबस्तासाठी तैनात जलद कृती दलाचे जवान येथील पोलीस ठाण्यातच ठाण मांडून जुगार खेळत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिले होते. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर पाच पोलिसांनी निलंबित करण्यात आले.

Web Title: Five police gamblers suspended

टॅग्स :Policeपोलिस