शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

यवतमाळसह पाच विमानतळ १५ वर्षांनंतर पुन्हा एमआयडीसीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:40 IST

अखेर रिलायन्सच्या विळख्यातून सुटका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सामंत यांचा धाडसी निर्णय

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगाने विकास व वापराबाबत पंधरा वर्षे कुजविलेले राज्यातील यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव व बारामती हे पाच विमानतळ अखेर मंगळवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने अंमलात आणला. आता इतर विमानतळांप्रमाणेच हे विमानतळही नवी कात टाकतील, अशी आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने या विमानतळांभोवतीचा फास अखेर सुटला आहे. मंगळवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिलायन्सकडून या विमानतळांच्या एमआयडीसीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली.

आधुनिकीकरण व विस्ताराच्या अपेक्षेने राज्य सरकारने यवतमाळचे जवाहरलाल दर्डा विमानतळ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे दिले होते. परंतु रिलायन्सने हे सुरू असलेले विमानतळ बंद पाडले. विस्तार सोडा परंतु अक्षरशः विमानतळाचे वाटोळे केले. अशीच अवस्था राज्यातील इतर चार विमानतळांचीही झाली. या प्रकारामुळे औद्योगिकरणालाही मोठी खीळ बसली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षमतेमुळे आता या विमानतळासह राज्यातील लातूर, नांदेड, धाराशिव व बारामती ही पाच परत एमआयडीसीकडे आले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी उद्योगमंत्री असताना मागास जिल्ह्यांमध्ये उद्योग-व्यवसायांना गती मिळावी, तसेच रोजगाराच्या संधी वाढाव्यात, विमानतळ उभारणीचे धोरण आणले. त्यातूनच कापसाची पंढरी असलेल्या यवतमाळ येथे विमानतळाची उभारणी झाली. रेमंडसारखा मोठा उद्योग ही त्या पुढाकाराची पहिली फलश्रुती होती. मात्र, २००९ मध्ये यवतमाळ, लातूर, नांदेड, धाराशिव व बारामती ही पाच विमानतळे ६३ कोटींच्या बोलीत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हल्पमेंटकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर या विमानतळांची दुर्दशा झाली. विकासाला खीळ बसली. त्यामुळे हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेऊन पूर्ववत एमआयडीसीकडे सोपवावे, अशी मागणी होत राहिली. राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी सातत्याने लावून धरली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न झाले. या अनुषंगाने एमआयडीसीने रिलायन्स कंपनीला तीन वेळा नोटीस बजावली. मात्र, रिलायन्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मंगळवारी हे सर्व पाच विमानतळ रिलायन्सकडून पुःनश्च एमआयडीसीकडे हस्तांतरित करून घेण्यात आले. यवतमाळ येथे याप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. बी. दाभेराव, प्रादेशिक अधिकारी स्नेहा पिंपरीकर-नंद, प्रमुख भूमापक जी. एस. बारसकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जागेचे मोजमाप करून पंचनामा झाल्यानंतर एमआयडीसीने विमानतळाचा ताबा घेतला.

आता पूर्ण क्षमतेने विमानतळ कार्यान्वित व्हावे - डॉ. दर्डारिलायन्स समूहाकडून विमानतळ काढून घेण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना धन्यवाद देत लोकमत' एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या मागणीनुसार तातडीने हालचाली करून सरकारने हे विमानतळ पुःनश्च एमआयडीसीकडे घेतले आणि या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळकरांना दिलेली ही मोठी भेट आहे. या निर्णयामुळे यवतमाळच्या औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला असून आता हे विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. धावपट्टी आणखी वाढविल्यास यवतमाळ येथेही बोइंगसारखी मोठी विमाने सहज उतरू alaugh शकतील. तेव्हा, धावपट्टी वाढवावी तसेच नाईट लॅन्डिंगची सुविधा उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने हे विमानतळ कार्यान्वित करावे, असे डॉ. विजय दर्डा म्हणाले.

टॅग्स :YavatmalयवतमाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUday Samantउदय सामंतAirportविमानतळ