आधी ब्लेडने स्वतःची जीभ कापली, नंतर गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:33 IST2026-03-19T12:29:52+5:302026-03-19T12:33:54+5:30
Yavatmal : विवाहित तरुणाने ब्लेडने स्वतःची जीभ कापली. त्यानंतर रक्तस्राव होऊन वेदना असह्य झाल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील भिलवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली.

First he cut off his own tongue with a blade, then committed suicide by hanging himself.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद (यवतमाळ) : विवाहित तरुणाने ब्लेडने स्वतःची जीभ कापली. त्यानंतर रक्तस्राव होऊन वेदना असह्य झाल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना येथील भिलवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली.
विकास प्रकाश हगवणे (वय ३२, रा. भिलवाडी, पुसद) असे मृताचे नाव आहे. विकास गेल्या काही दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याच्या पहिल्या पत्नीचा दीड वर्षापूर्वी विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. तिच्यापासून विकासला दोन अपत्ये आहेत. त्यानंतर विकासचे दुसरे लग्न लावून देण्यात आले होते. मंगळवारी दुपारी विकासने ब्लेडने स्वतःची जीभ कापून घेतली. त्यानंतर रक्तस्राव सुरू झाल्याने विकासला नातेवाइकांनी तातडीने स्थानिक रुग्णालयात नेले. परंतु जखम खोल असल्याने डॉक्टरांनी त्याला बाहेरगावी नेण्याचा सल्ला दिला. तात्पुरते उपचार करून विकासला घरी आणण्यात आले. मात्र, तोंडातून रक्तस्राव आणि वेदना कायम होत्या. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पत्नी शेजारी गेली असता, विकासने गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी घरी परत आली असता, तिला पती मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.