शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये मास्क न लावणाऱ्या १०० जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

पोलिसांनी शनिवारी मास्क न लावणारे व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या तब्बल १०० नागरिकांविरुद्घ दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास २२ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने त्यालाही दोन हजार रुपये एवढा दंड लावण्यात आला.

ठळक मुद्दे२२ हजारांच्या दंडाची वसुली, दुसऱ्या दिवशीही पोलिसांची धडक मोहीम, वाहनधारकांना बसली जरब

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना घरीच थांबा व सुरक्षित राहा, असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर विना मास्क फिरताना आढळून येत असल्याने प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. प्रशासनाने शनिवारी दुसऱ्या दिवशीही धडक मोहीम राबवून १०० जणांवर कारवाईचा बडगा उगारला.पोलिसांनी शनिवारी मास्क न लावणारे व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या तब्बल १०० नागरिकांविरुद्घ दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास २२ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने त्यालाही दोन हजार रुपये एवढा दंड लावण्यात आला.येथील गांधी चौक, सुभाष चौक, शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, श्रीरामपूर परिसर आदी ठिकाणी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, मुख्याधिकारी निर्मल राशिनकर, शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम, वसंतनगरचे प्रदिपसिंह परदेशी, वाहतूक शाखेचे ब्रिजपालसिंग ठाकूर, नगरपरिषदेचे अधिकारी अविनाश अर्धापूरकर, प्रशांत देशमुख, धर्मेंद्र ठाकूर, राजेश पवार आदींनी कारवाईची धडक मोहीम तीव्र केली.शहरातील मास्क न लावलेले व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या जवळपास १०० जणांविरुद्घ कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे जवळपास २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.दुकानदारांवरही कारवाईयेथील एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने त्यांना दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी याच पथकाने नियम न पाळणाऱ्या ८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन तब्बल ५६ हजार ६०० रुपये एवढा दंड वसूल केला होता. ही मोहीम यापुढे दररोज सुरु राहणार असून नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी केले आहे.रेड झोनमुळे कठोर उपाययोजनाकेंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये केला आहे. त्यामुळे प्रशासन व पोलिसांतर्फे कठोर उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाºया दुकानदारांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस