शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजी मंडी हटविली

By admin | Updated: January 20, 2016 03:37 IST

येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा

यवतमाळ : येथील आठवडी बाजारातील भाजी मंडीचे अतिक्रमण खुद्द व्यापाऱ्यांनीच मंगळवारी काढून प्रशासनाचा मार्ग मोकळा केला. मात्र पर्यायी जागेवर कुठल्याच सुविधा नसल्याने ठोक भाजी विक्रेते संपावर गेले आहे. त्यामुळे मंगळवारी भाज्यांचा लिलावच झाला नाही. याचा फटका शहरातील ३६०० भाजी विक्रेत्यांना बसला.यवतमाळच्या आठवडी बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून पहाटे भाज्यांचा लिलाव होतो. आता या ठिकाणी नगर परिषद व्यापारी संकुल उभारणार आहे. त्यासाठी ही भाजी मंडी उचलण्याची सूचना व्यापाऱ्यांंना देण्यात आली. त्यावेळी भाजी व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेची मागणी केली. त्यांंना विठ्ठलवाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत जागा देण्यात आली. मात्र या जागेवर कोणत्याही सुविधा नसल्याने भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले. तसेच सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला. तर दुसरीकडे प्रशासनाने सोमवारपर्यंत आठवडी बाजारातील दुकाने हटविण्याची मुदत दिली होती. सोमवारी भाजी मंडीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु हा मुद्दा नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आता कोणताही उपाय नाही म्हणून व्यापाऱ्यांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढणे सुरू केले. मंगळवारी सुमारे ४५ दुकाने हटविण्यात आली. दुसरीकडे नगर परिषद प्रशासनानेही येथील अतिक्रमण हटविण्याची जोरदार तयारी चालविली होती. परंतु स्वत:हूनच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढल्याने नगर परिषदेला काही करावे लागले नाही. दरम्यान ठोक भाजी विक्रेत्यांच्या संपाचा परिणाम सोमवारी मंडी बंद असल्याने दिसला नाही. परंतु मंगळवारी भाजी बाजारात लिलावच झाला नाही. जिल्हाभरातून शेतकरी आपला भाजीपाला मंडीत घेऊन आले होते. परंतु व्यापाऱ्यांनी लिलाव करण्यास नकार दिला. दुसरीकडे शहरातील चिल्लर विक्रेते भाजी खरेदीसाठी आले होते. त्यांनाही भाजी मिळाली नाही. शहरात आज कुठेच भाजी मिळाली नाही. याचा फटका ग्राहकांनाही बसला. (शहर वार्ताहर)४यवतमाळच्या भाजी बाजारात यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम, अकोला, अमरावती, कारंजा, खामगाव आणि मध्य प्रदेशातून दररोज १०० टन भाजीपाला येतो. त्यातून दर दिवसाला १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. या संपाने ही उलाढाल ठप्प झाली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला४ठोक भाजी मंडीवर ३६०० व्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यात तीन हजार हॉकर्स, दोनशे रिक्षा चालक, १०० आॅटोरिक्षा, २०० हमाल आणि १०० व्यापारी व दलालांचा समावेश आहे. त्यांचा उदरनिर्वाह यावरच चालतो. परंतु भाजी मंडीच्या संपाने या सर्वांचा रोजगार बुडाला.