शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा

By admin | Updated: September 28, 2016 00:18 IST

घरमालकीन आणि मोलकरणीला बांधून सहा सशस्त्र दरोडेखोरांनी भरदुपारी सिनेस्टाईल दरोडा टाकल्याची घटना येथील वाघापूर मार्गावरील सेमिनरी ले-आऊटमध्ये घडली.

दोन महिलांना घरातच बांधले : दरोडेखोर इम्पोर्टेड रिव्हॉल्वर घटनास्थळीच विसरले यवतमाळ : घरमालकीन आणि मोलकरणीला बांधून सहा सशस्त्र दरोडेखोरांनी भरदुपारी सिनेस्टाईल दरोडा टाकल्याची घटना येथील वाघापूर मार्गावरील सेमिनरी ले-आऊटमध्ये घडली. यातील दरोडेखोर इम्पोर्टेड रिव्हॉल्वर घटनास्थळीच विसरले, हे विशेष! या घटनेने शहरात एकच खळबळ उडली आहे. यात किती मुद्देमाल चोरी गेला हे मात्र वृत्तलिहेस्तोवर जाहीर केले नव्हते.सेमिनरी ले-आऊट परिसरात अनिल जवेरीलाल खिवसरा यांचे घर आहे. मंगळवारी दुपारी निर्मला अनिल खिवंसरा (४९) आणि त्यांची मोलकरीण प्रेमिला भीमराव मडावी या दोघीच घरी होत्या. दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यान दोन तरुणांनी घराचा मुख्य दरवाजा ठोठावला. दार उघडताच ‘मटीरिअल के पैसे लेना है, भैय्या घर पर है क्या’ असे त्या दोघांनी विचारले. मात्र नंतर निर्मला यांचे तोंड दाबून चाकूच्या धाकावर घरात आणले. तसेच दुसऱ्या साथीदाराने मोलकरीण प्रेमिलाही चाकूच्या धाकावर सोफ्यावर बसविले. त्यानंतर पॅकिंग पट्टीने दोनही महिलांचे हातपाय व तोंड बांधले. घरातील कपाट फोडून मुद्देमालाचा शोध घेतला. दरोडेखोरांनी काही सोन्याच्या अंगठ्या, चिल्लर नोटांचे बंडल त्यांनी जागेवरच सोडून दिले. त्यानंतर देवघरातील आलमारी उघडून शोधाशोध केली. त्यानंतर दरोडेखोर घरातून निघून गेले. निर्मला खिवंसरा यांनी कशीबशी सुटका केली. त्यावेळी घरात एक कॅरिबॅगमध्ये एका कागदात गुंडाळलेली इम्पोर्टेड रिव्हॉल्वर दिसले. रिव्हॉल्वर घेण्यासाठी दरोडेखोर परत येतील, अशी त्यांना धास्ती होती. दरम्यान मोलकरणीचे हातपाय सोडले. घटनेची माहिती बाभूळगाव येथे गेलेले पती अनिल खिवंसरा यांना दिली. त्यानंतर तातडीने पोलीस व खिवंसरा कुटुंबियांचे नातेवाईक घटनास्थळावर पोहोचले. आरोपी सहा असल्याचे सांगितले जात आहे. एक आरोपी फाटकावर उभा होता. तर दोघे आतमध्ये शिरले आणि रस्त्यावर काही आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी घरात प्रवेश करताना चेहरा उघडाच ठेवला होता. उलट घराबाहेर पडताना त्यांनी गळ्यातील शेल्याने तोंड झाकण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण करून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान काही अंतरापर्यंत गेल्यानंतर घुटमळले. आरोपी विसरलेल्या रिव्हॉल्वरचाही गंध श्वानाला देण्यात आला. त्यानंतरही फार सुगावा लागला नाही. पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष केंद्रीत केले आहे. चिद्दरवार यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल रंगाची एम.एच.३१ पासिंग असलेली क्वॉलिस गाडी आली आहे. पोलीस सध्या या वाहनाचा तपास घेत आहे. या प्रकरणी निर्मला खिवसरा यांनी तक्रार दिली. घटनास्थळावर डीवायएसपी पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख, शहर ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार पंत आदींनी भेट दिली. (कार्यालय प्रतिनिधी) शेजाऱ्यांनी ऐकला आवाजमुझे मारो मत, छोड दो असा आवाज शेजारी असलेल्या महिलेला ऐकायला आला. मात्र लहान मुलाला कुटुंबातील कोणी ज्येष्ठ रागावत असेल म्हणून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आरोपींनी निर्मला खिवंसरा यांच्याशी झटापट केली तेव्हा त्यांनी आरोपींना मारो मत, छोड दो अशी गयावया केली होती.