पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:14 IST2020-04-21T12:14:19+5:302020-04-21T12:14:40+5:30

रामदास  नेहमी प्रमाणे काल मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक  विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केलें. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला

Father kills drunk son, throws incident at Mahagaon taluka in Yavatmal district | पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना

पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव (यवतमाळ) - दारू पिऊन दररोज घरी वाद घालणाऱ्या मुलाला पित्यानेच ठार मारणल्याची घटना महागाव तालुक्यातील मलकापूर(चिखली) येथे सोमवारी रात्री ११:३० वाजता घडली. रामदास भीमराव रणमले (वय २५ वर्ष ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रामदास  नेहमी प्रमाणे काल मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक  विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केलें. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला असता त्याला उपचारासाठी पुसद येथे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु रस्त्यातच त्याची प्राणज्योत माळवली. या घटनेची पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी महागाव पोस्टे ला व त्याच्या पत्नीला माहिती दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहेपर्यंत  गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.   रामदास हा विवाहित असून पती पत्नीत वाद असल्याने मागील दीड वर्षांपासून पत्नी माहेरी राहत असल्याचं कळते.


घरगुती वादात ही घटना घडली आहे.यातील आरोपी मृताचे वडील भीमराव रणमले यांना आम्ही ताब्यात घेतले आहे. यामध्ये मृतांच्या आईचे बयन नोंदवत आहे.  
दामोदर राठोड,
ठाणेदार महागाव.
 

Web Title: Father kills drunk son, throws incident at Mahagaon taluka in Yavatmal district