बस-ट्रकचा भीषण अपघात, दाेघांचा जागीच मृत्यू; आठ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 22:38 IST2025-12-04T22:37:02+5:302025-12-04T22:38:32+5:30

वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील घटना

fatal bus truck accident two dead on the spot eight seriously injured | बस-ट्रकचा भीषण अपघात, दाेघांचा जागीच मृत्यू; आठ गंभीर जखमी

बस-ट्रकचा भीषण अपघात, दाेघांचा जागीच मृत्यू; आठ गंभीर जखमी

मारेगाव/करंजी/पांढरकवडा (यवतमाळ) : भरधाव ट्रक व बसमध्ये समाेरासमाेर धडक हाेवून भीषण अपघात झाला. यात दाेन प्रवासी जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर आणि दाेघे किरकाेळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ८:२० वाजेच्या सुमारास वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील जळका फाट्यावर घडली.

नवनाथ शिवाजी काचे (वय ३०, रा. अंकुलगा, जि. लातुर), भीमराव मरस्कोल्हे (वय ५०, रा. मंगी, ता. केळापूर) अशी मृतांची नावे आहेत. शुभम ढोंबरे, रोहित योकनकर रा. मोहदा, सचिन झिलपे रा. बोटोनी, अमोल टेकसे रा. मेटीखेडा, संतोष खिलके रा. किंगा, प्रसाद चिंचोळकर रा. मेटीखेडा, विमल मरस्कोल्हे रा. मंगी, दुर्गा ठाकरे रा. ब्रम्हपुरी, नरेंद्र मडावी रा. मंगी, भीमराव मडावी रा. मंगी अशी गंभीर जखमींची नावे असून, त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. इतर दोन किरकोळ जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात भरती केले आहे.

एमएच ४० वाय ५७८२ क्रमांकाची बस वणी येथून यवतमाळला जात होती. तर एमएच २८ बीबी ५८२७ क्रमांकाचा ट्रक वणीकडे येत हाेता. दाेन्ही वाहनांमध्ये जाेरदार धडक बसली. या अपघातात बस एका बाजूने पूर्णत: कापल्या गेली. अपघात घडताच चालक बेशुद्ध पडल्याने बस २०० मीटर लांब जात रस्त्याच्या खाली उतरून थांबली. यावेळी वणीचे आमदार संजय देरकर जळका येथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले असता अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सर्व जखमी व मृतांना गावकऱ्यांच्या सहकार्याने करंजी व पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक हाेते. यात नवनाथ काचे, भीमराव मरस्कोल्हे हे दाेन प्रवासी जागीच ठार झाले तर इतर प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी पाेलिसांनी नाेंद घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.

जेवणाचा डबा घेतल्यानंतर काही अंतरावरच अपघात

बसचे कंडक्टर सचिन दौलत झिलपे हे बोटोनी गावचे रहिवासी असून, त्यांनी घरून जेवणाचा डबा घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच अपघात झाला. दरम्यान, प्रल्हाद अरविंद चिंचोळकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

Web Title : बस-ट्रक की टक्कर में दो की मौत, आठ घायल, यवतमाल के पास।

Web Summary : यवतमाल के पास बस और ट्रक की सीधी टक्कर में दो लोगों की मौत हो गई और आठ गंभीर रूप से घायल हो गए। दुर्घटना वणी-यवतमाल राजमार्ग पर हुई। घायलों को यवतमाल और पांढरकवड़ा के अस्पतालों में भर्ती कराया गया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Bus-truck collision kills two, injures eight near Yavatmal.

Web Summary : A bus and truck collided head-on near Yavatmal, killing two and seriously injuring eight. The accident occurred on the Wani-Yavatmal highway. Injured were shifted to hospitals in Yavatmal and Pandharkawda. Police are investigating.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात