शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By admin | Updated: July 9, 2016 02:37 IST

मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे

देशी कापूस उत्पादनाचा उपक्रम : झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबांना बियाणे वाटपयवतमाळ : मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रम ११३ आदिवासी शेतकऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबांना देशी कापूस बियाणे वाटप करण्यात आले असून या आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रयत्नातून झरी तालुक्यातील हिवरा बा., कटली बोरगाव, पालगाव, बोटोनी, पाचपोर या गावातील ५० शेतकऱ्यांनी बिगर बीटी कापूस बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्याचा मानस दर्शविला. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील यांनी बिगर बीटी बियाणे उपलब्ध करून दिले. कृषी दिनाचे औचित्य साधून पांढरकवडा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात तिवारी यांच्या हस्ते बिगर बीटी कापूस बियाणे वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.तिवारी यांनी पारंपरिक शेतीचा आवळगाव पॅटर्न राज्यभर राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. क्षेत्रात कापसाच्या बीटी बियाण्याचा वापर, कृषीनिविष्ठेकरिता बाजारावरील अवलंबित्व यामुळे शेतीतील नफा कमी होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबी शाश्वत शेतीची कास धरून, वाटप करण्यात आलेल्या बियाण्यातून बियाणे उत्पादित करून, गावात देशी कापसाची बियाणे बँक उभारण्याचे आवाहन केले.पांढरकवडा येथील उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी अतिघनता कापूस लागवड आणि बियाणे उत्पादन कार्यक्रमाविषय माहिती दिली. आजही शेतकरी देशी कापूस बियाणे उत्पादन करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कृषी विभागामार्फत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता कृषी विभाग सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय परिसरात तिवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा आत्राम, मुन्ना बोलेनवार, अंकित नैताम, मोहन जाधव, तंत्र अधिकारी एम. बी. गोंधळी, कृषी अधिकारी सोनाली कवडे, निलेश ओळंबे, कृषी सहायक ए. एच. बोके. गजानन कोरे आदी उपस्थित होते. रोहीत राठोड यांनी सूत्रसंचालन केले. (स्थानिक प्रतिनिधी)