शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची सर्रास लूट

By admin | Updated: May 27, 2014 01:13 IST

परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट सुरू आहे. कृषी केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण अनेकांनी अद्याप केलेलेच नाही.

बिटरगाव : परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट सुरू आहे. कृषी केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण अनेकांनी अद्याप केलेलेच नाही. तरीसुद्धा काही कृषी केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात तेही बोगस बियाण्यांची विक्री सुरू असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. सध्या पेरणीचे दिवस जवळ येऊन ठेपले असल्याने तसेच उन्हाळी कापसाची लागवड परिसरात मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकर्‍यांनी कृषी केंद्रांवर एकच गर्दी केली आहे. याच गर्दीचा व शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्र चालकांकडून बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. अशा कृषी केंद्रांना शोधून काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आव्हान जिल्हा कृषी विभागाकडे आहे. कृषी केंद्र चालकांना जे बियाणे एमआरपी किंमतीच्या अर्ध्या किंमतीत मिळतात किंवा ज्या कंपनीकडून त्यांचे बियाणे अधिकाधिक विक्री केल्यास भेटवस्तू अथवा मोठे पॅकेज दिले जाते, अशाच कंपन्यांचे बियाणे ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार सर्रास घडत आहे. असे बियाणे कसे चांगले आहे, हे विक्रेते अतिशय पद्धतशीरपणे ग्राहकांच्या गळी उतरवित असल्याचे दिसून येते. आंध्रप्रदेशातल बियाणे कंपन्यांचा महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात शिरकार झाला असून बिटरगाव सारखा जंगल भाग त्यांनी त्यांची बियाणी विक्रीसाठी प्रामुख्याने निवडला आहे. उल्लेखनिय म्हणजे बिटरगाव परिसरात सध्या सुरू असलेल्या कृषी केंद्र चालकांपैकी कुणाचाही परवाना नूतनीकरण केलेला नाही. तरीसुद्धा अशा केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात दररोज बियाण्यांची सर्रास विक्री सुरू आहे. यासंदर्भात उमरखेड पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस.के. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता सदर कृषी केंद्र चालकांनी जर विहित नमुन्यात परवाना नुतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले असेल तर त्यांना माल विकता येतो परंतु त्यांच्या परवाना नूतनीकरणाचा वैधता कालावधी संपला असेल तर त्यांना बियाणे व खते विक्री करता येत नाही. अशा कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येइल. शेतकर्‍यांनी मात्र कृषी केंद्र चालकांकडून आपण घेतलेल्या मालाचे पक्के बिल घ्यावे. तसेच नामांकीत व विश्वसनिय कंपनीचेच बियाणे खरेदी करावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी शेतकर्‍यांना केले. (वार्ताहर)