शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप चोरट्यांची शेतकऱ्यांत दहशत

By admin | Updated: November 6, 2014 02:20 IST

यवतमाळ उपविभागात केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल दोन हजारांवर कृषी पंप चोरीस गेले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंदही घेण्यात आली.

शिवानंद लोहिया हिवरीयवतमाळ उपविभागात केवळ एका वर्षाच्या कालावधीत तब्बल दोन हजारांवर कृषी पंप चोरीस गेले. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये या घटनांची नोंदही घेण्यात आली. मात्र एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. मोटरपंप चोरणारे रॅकेटच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सक्रीय आहे. ते मोटरपंपाबरोबर केबल, सिंचनासाठी ठेवलेले पाईप याच साहित्यावर डल्ला मारत असल्याचेही अनेक घटनांवरून दिसून येते. असे असताना ग्रामीण भागात पोलिसांची नेमकी गस्त होते कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात मोटरपंप चोरणाऱ्या रॅकेटमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्याचे मोटरपंप चोरीस गेल्याचे लक्षात आले. मात्र कोर्टकचेरीच्या भानगडीत कोण पडेल म्हणून त्याने याची पोलिसात तक्रार केली नाही. शेतामधील मोटरपंप चोरण्यापूर्वी जिवंत विद्युत पुरवठ्याची केबल तोडायची, त्यानंतर एका साथीदाराला विहिरीत उतरवून दोराच्या सहाय्याने ही मोटर बाहेर काढायची. त्यानंतर शेताच्या बाहेर ठेवलेल्या दुचाकीवरून ती लंपास करायची, अशी या चोरट्यांची मोडस आॅपरेंडी आहे. मोटरपंपाबरोबरच स्प्रिंकलर पाईप, नोझल, वीज पुरवठ्याची केबल, रोहित्रातील आॅईल आदी साहित्यही हे चोरटे लक्ष्य करीत आहेत. आता तर गोठ्यातील जनावरे चोरून नेण्याचाही सपाटा त्यांनी चालविला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाने पिके धोक्यात येतात. गेल्या काही वर्षात दरवर्षीच ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकांनी कर्ज करून, पोटाला चिमटा घेवून एकेक पैसा गोळा करीत सिंचनाचे साहित्य खरेदी केले.