शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

उकणी खाणीचे विस्तारीकरण उधारीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

तालुक्यातील उकणी (डीप) या कोळसाखाणीचे विस्तारीकरण उधारीवर सुरू आहे. विस्तारीकरणासाठी वेकोलिने जमिनी संपादीत केल्या. मागील वर्षी त्याचा मोबदलाही दिला. परंतु काही लाभार्थ्यांना अद्यापही नोकऱ्या देण्यात आल्या नाही आणि ज्यांना नोकऱ्यां नको आहे, त्यांना नियमानुसार कम्पलसेशनही देण्यात आले नाही. यासाठी संबंधिताना वेकोलि कार्यालयात येरझारा कराव्या लागत आहे.

ठळक मुद्देमोबदला मिळाला : नोकऱ्या, कम्पलसेशनसाठी शेतकऱ्यां येरझारा

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील उकणी (डीप) या कोळसाखाणीचे विस्तारीकरण उधारीवर सुरू आहे. विस्तारीकरणासाठी वेकोलिने जमिनी संपादीत केल्या. मागील वर्षी त्याचा मोबदलाही दिला. परंतु काही लाभार्थ्यांना अद्यापही नोकऱ्या देण्यात आल्या नाही आणि ज्यांना नोकऱ्यां नको आहे, त्यांना नियमानुसार कम्पलसेशनही देण्यात आले नाही. यासाठी संबंधिताना वेकोलि कार्यालयात येरझारा कराव्या लागत आहे.उकणी (डीप) खाणीसाठी वेकोलि प्रशासनाने सन २०११ मध्ये उकणी व पिंपळगाव खंड दोनमधील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ३०४ हेक्टर शेती संपादीत केली. या संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल आठ वर्षानंतर म्हणजेच सन २०१९ मध्ये दिला.यातील काही शेतकºयांच्या पाल्यांना वेकोलिने नोकऱ्याही दिल्या. परंतु २० लाभार्थ्यांना अद्यापही नोकरी अथवा कम्पलसेशन देण्यात आले नाही. मागील अनेक महिन्यांपासून लाभार्थी वेकोलिच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु वेकोलिकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.तर कोळसा खाण बंद पाडू -विश्वास नांदेकरवेकोलिने जमिनी घेऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले आहे. अनेक लाभार्थ्यांना नोकºया किंवा नोकरीचे कम्पलसेशन अद्याप देण्यात आले नाही. येत्या आठ दिवसांत वेकोलिने संबंधित शेतकºयांना नोकरी अथवा कम्पलसेशन दिले नाही, तर उकणी कोळसा खाण बंद पाडू, असा गर्भीत इशारा शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी दिला आहे. या कोळसा खाणीत ओव्हरबर्डन वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरण्यात येत आहे, ती सर्व वाहने कालबाह्यझाली असून या वाहनांना आरटीओने परवानगी दिलीच कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्या रस्त्यावर वेकोलिची वाहने धावत आहेत, ते रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे आहेत. या रस्त्यावरून विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा आरोपही विश्वास नांदेकर यांनी केला.