शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट वाहतूक पास वाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा छडा लावला. सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अजिंक्य प्रकाश गंगमवार रा. महागाव असे या सायबर कॅफे चालकाचे नाव आहे. त्याने ऑनलाईन पासचा अर्ज भरुन मिळेल अशा स्वरूपाची जाहिरात केली होती. सायबर कॅफेवर अर्ज स्वीकारून ऑनलाईन फिड केले जात होते.

ठळक मुद्देमहागावातील सायबर कॅफे : अजिंक्य कॉम्प्युटरचा संचालक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलकडून पासेस दिल्या जात आहे. पाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हीच बाब हेरुन महागाव येथील अजिंक्य कॉम्प्युटरच्या संचालकाने बनावट पासेसचा गोरखधंदा सुरू केला. गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा छडा लावला. सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले.अजिंक्य प्रकाश गंगमवार रा. महागाव असे या सायबर कॅफे चालकाचे नाव आहे. त्याने ऑनलाईन पासचा अर्ज भरुन मिळेल अशा स्वरूपाची जाहिरात केली होती. सायबर कॅफेवर अर्ज स्वीकारून ऑनलाईन फिड केले जात होते. ज्यांच्या पासेस पोलीस प्रशासनाकडून नाकारण्यात आल्या अशांनाही २०० रुपयात पास देण्याचा गोरखधंदा सुरू केला. हा प्रकार एका सुज्ञ नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे गोपनीय तक्रार केली. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अजिंक्य गंगमवार याला रंगेहात ताब्यात घेतले. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणात भादंवि कलम ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७४, ४७६ नुसार तसेच सह कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला.लॉकडाऊन काळात विविध व्यावसायिकांकडून पासेससाठी ऑनलाईन अर्ज केले जात आहे. पोलिसांच्या सायबर सेलमध्ये या अर्जांची पडताळणी करून खरोखरच आवश्यकता आहे अशांनाच पासेस दिल्या जात आहे. किरकोळ कारण किंवा कागदपत्राची पूर्तता न झालेल्या ऑनलाईन अर्जाला तत्काळ खरीज केले जात होते. याच संधीचा फायदा सायबर कॅफे चालकाने घेतला. किरकोळ कारणाने ऑनलाईन अर्ज केलेल्यांनाही परस्परच बनावट पासेस तयार करून वितरित केल्या. यासाठी त्याने मोठी रक्कमही घेतली. या बनावट पासेस तयार करण्यामध्ये एकूण सहा जणांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पुसद उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके व श्रीकांत जिंद्दमवार या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा गुन्हा उघड केला.हॅकरशी कनेक्शनची माहितीराज्यपातळीवर गाजलेल्या ठाणे क्राईम ब्रँचच्या कारवाईतील एका प्रोफेशनल हॅकर्सशी अजिंक्य गंगमवार संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस पथक त्या दृष्टीनेही तपास करीत आहे. यांचे कनेक्शन असल्यास मोठा गौप्य स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक