शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

उपबाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला गावाजवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उपबाजार समित्या निर्माण केल्या. जिल्ह्यातील १७ बाजार समित्या आणि २५ उपबाजार समित्या आहेत.

यवतमाळ: शेतकऱ्यांच्या शेतमालाला गावाजवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उपबाजार समित्या निर्माण केल्या. जिल्ह्यातील १७ बाजार समित्या आणि २५ उपबाजार समित्या आहेत. मात्र या ठिकाणी असलेली उलाढाल मंदावली आणि आता तर बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यासोबतच २५ ठिकाणी उपबाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी शेतमालाची उलाढाल होते. ही उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात असते. यातून बाजार समितीला दरवर्षी लाखो रुपयांचा सेस मिळतो. मिळणाऱ्या सेसवर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दुरुस्ती आणि इतर खर्च केला जातो. त्यामुळे बाजार समितीसाठी सेस फंड म्हणजे बाजार समितीचा उत्पन्न स्रोत होय. यासाठी प्रत्येक बाजार समिती प्रयत्न करते. यावर्षी मात्र चित्र अगदी विरुद्ध आहे. शेतकऱ्यांच्या घरातच माल नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतमाल येणार तरी कोठून. जिल्ह्याच्या ठिकाणी शुकशुकाट आहे. तर इतर बाजार समित्यांची काय अवस्था. मुख्य बाजार समित्याच प्रभावित झाल्या. तेथे उपबाजार समित्यांची अवस्था त्याही पेक्षा दयनीय आहे. जिल्ह्यात असलेल्या २५ उपबाजार समित्यांमधील बहुतांश ठिकाणी अद्याप उलाढालीला शुभारंभही झाला नाही. यातून बाजार समितीचे कामकाज प्रभावित झाले. उलाढाल न झाल्याने सेस मिळणार नाही. सेस मिळाला नाही तर करायचे काय अशा स्थितीत या उपबाजार समितीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.गतवर्षी कापसाचा अनुभव वाईट आहे. अनेक व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी यंदा जिनिंगच बंद आहे. जीन नसल्याने कापूस येणार नाही. त्यामुळेही उपबाजार समितीच्या आर्थिक उलाढालीला बेक्र लागला आहे. (शहर वार्ताहर)