शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेसाठी सर्वच पर्यायांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन सभापतींवर अविश्वास आणला गेला. त्यानंतर शिवसेनेने दोन पदांवर बाजी मारली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : युती, महाविकास आघाडीचे घोडे तबेल्यातच, ३१ चा मॅजिक फिगर जुळविण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्यास अवघे आठ दिवस उरले असतानाही जिल्हा परिषदेत नेमकी कुणाची सत्ता स्थापन होईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन सभापतींवर अविश्वास आणला गेला. त्यानंतर शिवसेनेने दोन पदांवर बाजी मारली. सध्या सर्वच पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या सदस्यांमध्ये सत्तेची खुमखुमी दिसत आहे. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याने जिल्हा परिषदेत तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.२० डिसेंबरनंतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्तेसाठी पक्षांमध्ये घमासान सुरू झाले आहे. कोणत्याही स्थितीत सत्ता स्थापन करण्याचा पर्याय सर्वच पक्षांनी खुला ठेवला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यास पदांच्या वाटणीवरून कलह होण्याची शक्यता आहे.काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन पदांची मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र शिवसेना या दोन पक्षांना चार पदे देण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुर होण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे भाजपनेही अद्याप आशा सोडली नाही. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने कोणत्याही स्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी घडामोडी सुरू केल्या आहे. ऐनवेळी शिवसेना आणि भाजपचीही युती होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर राहावे लागू शकते. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रितपणे जादा पदांची मागणी केल्यास शिवसेना आणि भाजपसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.निवडीची तारीख अद्याप निश्चित नाहीविद्यमान पदाधिकाऱ्यांचा वाढीव १२० दिवसांचा कार्यकाळ येत्या २० डिसेंबरला संपणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव र.आ. नागरगोजे यांनी दिले आहे. मात्र त्या पत्रात निश्चित तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे २० डिसेंबरनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नोटीस काढण्याची शक्यता आहे. नोटीस निघाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे अद्यापही नवीन पदाधिकाºयांच्या निवडीची तारीख निश्चित नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका