तिकीट मिळाले नाही तरी आता करता येणार प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST2022-03-14T05:00:00+5:302022-03-14T05:00:16+5:30
रेल्वेमधून प्रवास करताना अनेकांना रिझर्वेशन उपलब्ध होत नाही तर काही प्रवासी रेल्वेमध्ये वेळेवर चढतात. अशावेळी प्रवाशांना तिकीट चेकरकडून मोठा दंड भरावा लागत होता. आता या प्रकारावर मात करण्यासाठी हॅन्ड हेल्ड टर्मिनल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही गाड्यांमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया टीसीमार्फत राबविली जात आहे. त्यामध्ये प्रवाशाकडून तिकीट काढल्यानंतर समोरच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

तिकीट मिळाले नाही तरी आता करता येणार प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रेल्वेचे तिकीट काढताना वेटिंग लिस्ट मोठी आहे. या कारणाने अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. मात्र, अनेक वेळा विविध कारणांनी तिकीट रद्द होतात. अशावेळी रेल्वेने प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांना वेळेवरही तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. अशा स्वरूपाचे तिकीट काढल्यानंतर तिकीटाच्या एकूण दराच्या दहा टक्के रक्कम कमी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे. याशिवाय हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या माध्यमातून रेल्वेत चढल्यानंतर तिकीट नसेल तर तिकीट चेकरच्या माध्यमातून हे तिकीट काढून पुढचा प्रवास करता येणार आहे. ही सुविधा सध्या काही मोजक्या गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. इतर गाड्यांसाठी ही सुविधा सुरू झाली नाही. एकूणच काही शिथीलता रेल्वेने आणलेली आहे.
नियमांची अंमलबजावणी लवकरच होईल
रेल्वेमधून प्रवास करताना अनेकांना रिझर्वेशन उपलब्ध होत नाही तर काही प्रवासी रेल्वेमध्ये वेळेवर चढतात. अशावेळी प्रवाशांना तिकीट चेकरकडून मोठा दंड भरावा लागत होता. आता या प्रकारावर मात करण्यासाठी हॅन्ड हेल्ड टर्मिनल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही गाड्यांमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया टीसीमार्फत राबविली जात आहे. त्यामध्ये प्रवाशाकडून तिकीट काढल्यानंतर समोरच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय रेल्वेचे नुकसानही टळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने ग्राहकांच्या सुविधेसाठी काही नवीन बदल केलेले आहे. त्यामध्ये रेल्वे येण्यापूर्वी प्रवाशांचा सिटिंग चार्ट रेल्वे स्थानकावर लागतो. यानंतर कुठलीही तिकीट काढता येत नव्हती. आता हा चार्ट लागल्यानंतर जागा रिकामी असेल तर रेल्वे स्थानकावरून ते तिकीट काढता येणार आहे.
- संदीप दुधे, रिझर्वेशन सुपरवायजर