शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

‘ईटीआय’ मशीनचा वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:00 AM

माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी यासाठी एसटी प्रशासनाकडून तूर्तास तरी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले नाहीत.

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी वापरात आणलेल्या मशीन उठल्या जिवावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाने वापरात आणलेल्या ईटीआय मशीन आज वाहकांच्या जिवावर उठल्या आहेत. कालमर्यादा संपल्यानंतरही घासून घासून त्याच त्या मशीन वापरल्या जात असल्याने वाहक वैतागले आहेत. ही मशीन केव्हा बंद पडेल आणि वाहक तिकीट चोरीच्या गुन्ह्यात कसा अडकेल, याचा नेम राहिलेला नाही. याची भीती या कर्मचाऱ्यांना आहे. माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी यासाठी एसटी प्रशासनाकडून तूर्तास तरी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले नाहीत. दररोज शेकडो मशीन बिघडण्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे दाखल होत आहेत. हे अधिकारी पाठपुरावा तेवढा करतात. मध्यवर्ती कार्यालयाने मात्र या विषयाला अजून तरी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.

 वर्षभरात १२०० तक्रारी

 ईटीआय मशीन साथ देत नसल्याच्या वर्षभरात यवतमाळ विभागात १२०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने तक्रारी होत असतानाही नवीन मशीन आणण्यासाठी कारवाई होत नाही. महामंडळाने या मशीनमध्ये अनेक नवीन व्हर्जन टाकले आहेत. आधीच या मशीनची क्षमता संपलेली आहे. त्यात नवीन कामांचा भरणा झाला असल्याने या मशीन हँग होत असल्याच्या तक्रारी आहेत. मशीनमध्ये अचानक बिघाड होऊन तिकीट देणे थांबल्यास आणि त्याचवेळी तपासणी पथक दाखल झाल्यास वाहकांवर कारवाई केली जाते. निलंबनासारख्या कारवाईत ते अडकतात.

वाहक म्हणतात...

ईटीआय मशीन बंद पडल्यास सुरू होण्यास वेळ लागतो. काही प्रसंगी स्टार्ट बटन दाबताना अधिक तिकीट बाहेर येतात. याचा भुर्दंड वाहकाला बसतो. ज्या गावचे तिकीट निघाले तेथील प्रवासी न मिळाल्यास रक्कम भरावी लागते.- उत्तम अजमिरे, वाहक

मशीनमध्ये नवीन व्हर्जन आले आहे. बुकिंग करताना मशीन बंद पडल्यास एसटी बस थांबविता येत नाही. गर्दी असल्यास आणि त्याचवेळी पथक आल्यास वाहकाला दोषी ठरविले जाते. केस दाखल करून कारवाई केली जाते.- अरुण काळे, वाहक

नवीन मशीनसाठी पाठपुरावा सुरू आहेमागील काही वर्षांपासून ईटीआय मशीनची समस्या वाढली. बिघडलेल्या मशीन दुरुस्त करून वापरात आणल्या जातात. नवीन मशीनचा निर्णय मध्यवर्ती कार्यालयाकडून घेतला जातो. यासाठी पाठपुरावा होत आहे.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ

 

टॅग्स :state transportएसटी