शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या पुनर्वसनासाठी अभियंता सागरची धडपड

By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST

लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने

प्रकाश लामणे ल्ल पुसदपुसद : लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. आपल्या सारख्याच अनाथ असलेल्या अनेकांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्याने धडपड सुरू केली. आज त्याने ४८० अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. सामाजिक जाणीव असलेल्या या तरुणाचे नाव आहे, सागर रेड्डी. नवी मुंबईतील एल अ‍ॅन्ड टी कंपनीत प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून २६ वर्षीय सागर काम करतो. राज्यभरातील अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर प्रवास सुरू केला आहे. त्याअंतर्गत पुसद येथे आला असता ‘लोकमत’शी बोलत होता. सागरने एकता निराधार संघ स्थापन केला आहे. त्या माध्यमातून ठाणे, मुंबई, वाशी, पुणे येथील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तो धडपडत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवर या विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याला करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे, असे सांगत पोटतिडकीने सांगतो. सागर हा मूळचा आंध्रप्रदेशातील. सागरचे आई-वडील मुंबईत उच्च शिक्षणासाठी होते. वडील व्यंकटेश रेड्डी यांनी महाराष्ट्रीय तरुणी पौर्णिमा काळे हिच्यासोबत प्रेमविवाह केला. त्यांच्या संसारवेलीवर सागरच्या रुपाने फुल उमलले. सुखाचा संसार सुरू असताना काळाची दृष्ट नजर लागली. सागर अडीच वर्षाचा असताना प्रेमविवाह प्रकरणातून या दाम्पत्याची आंध्रप्रदेशात हत्या करण्यात आली. सागर अनाथ झाला. त्यानंतर आला तो लोणावळाच्या आंतरभारती अनाथालयात तेथेच वयाच्या १८ वर्षापर्यंत त्याचे लालन-पालन झाले. मात्र १८ वर्ष पूर्ण झाले की आश्रमातून बाहेर पडावे लागते. सागर समोरही हाच प्रश्न निर्माण झाला. मात्र परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सागरने परिस्थितीवर मात करीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. एल अ‍ॅन्ड टी कंपनीत नोकरीही मिळाली. मात्र आपल्या वाट्याला आलेला अनाथाचा प्रवास इतरांच्या वाट्याला येऊ नये, अनाथांचे शिक्षण व्हावे म्हणून एकता निराधार संघ स्थापन केला. अनाथ तरुणांना एकत्र करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी स्वत:च्या वेतनातील पैसे तो खर्च करतो. सुटीत वेळ काढून अनाथांच्या पंखात बळ भरण्याचे काम करतो. आता तो राज्यातील दानशुरांंना आव्हान करीत असून अनाथांच्या हक्कासाठी धडपडत आहे.