शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : निवडणुका शहरकेेंद्री, त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष- श्रीहरी अणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:12 IST

सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत.

यवतमाळ : सध्याच्या निवडणुका केवळ शहरकेंद्री झाल्या आहेत. त्यामुळे अशा निवडणुकांचे ‘आउटपूट’ही शहराभिमुखच असते. निवडून येणा-या राजकीय पक्षांचे खेड्यांकडे दुर्लक्ष होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या होत असताना नागपुरात मेट्रो सुरू करणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. शनिवारी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. अणे बोलत होते.विदर्भ राज्य आघाडीचे विधानसभा उमेदवार अ‍ॅड. अमोल बोरखडे यांच्याबाबत भूमिका मांडताना अणे यांनी एकंदरच निवडणुकांबाबत मुद्दे मांडले. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवरच व्हावी. मात्र आज स्थानिक प्रश्नांना कोणताही राजकीय पक्ष महत्त्व देताना दिसत नाही. त्याऐवजी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरच्या मुद्दे पुढे केले जात आहे. राफेल विमानाखाली लिंबू का ठेवले, यातच विरोधी पक्षही डोके खराब करून घेत आहे. मात्र राफेल घोटाळ्याबाबत कोणीही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची बौद्धिक भांडवलाची खोली रिकामी झाली आहे. केवळ भावनिक मुद्द्यांच्या बळावर मते मिळवणे, एवढेच त्यांना कळते. मात्र राजकीय पक्षांनी आपला ‘फोकस’ बदलला नाही, तर ग्रामीण भागात राहणा-या ७० टक्के मतदारांना न्यायच मिळणार नाही. विदर्भ राज्य आघाडीचा उमेदवार मात्र ग्रामीण भागाशी जुळलेला आहे, असे अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले. विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष निरज खांदेवाले यावेळी म्हणाले, आम्ही अनेक समविचारी संघटना एकत्र येऊन विदर्भ निर्माण महामंच तयार केला आहे. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी झाली आहे. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. तर अ‍ॅड. अमोल बोरखडे म्हणाले, विधानसभेत एकमेकांविरुद्ध प्रचार करीत असलेले पक्ष स्थानिक बाजार समितीत, जिल्हा परिषदेत मात्र एकत्र सत्ता भोगत आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ‘ते’ उमेदवार म्हणजे, शेंदूर फासलेले दगडकोणताही उमेदवार हा स्वत:च्या पायावर उभा असला पाहिजे. केवळ पक्षश्रेष्ठींनी उभा केलेला माणूस आपल्या मतदारसंघासाठी पात्र असेलच असे नाही. एका पक्षातून दुसरीकडे उड्या मारणारे कोणत्या उपयोगाचे? उमेदवार हा पात्र माणूस असला पाहिजे. पक्षाने उभा केलेला माणूस म्हणजे दगडा शेंदूर फासण्याचा प्रकार आहे, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.जे काश्मिरात झाले, ते विदर्भातही शक्यवेगळा विदर्भ देण्यात दिल्ली सरकार हीच मोठी अडचण आहे. ३७० कलम बदलून जसे काश्मिरचे विभाजन करण्यात आले, त्याच प्रमाणे घटनेतील तरतुदी वापरून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे शक्य आहे. विदर्भच काय, बुंदेलखंड, गोरखालँड या अविकसित भागांनाही स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे शक्य आहे. मात्र, मोदी-शहांची इच्छा नसेल, तर कोणीही वेगळा विदर्भ देऊ शकत नाही. फडणवीस-गडकरी यांच्याही शब्दाला दिल्लीत वजन नाही, अशी टीका अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019