शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे आणखी आठ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पांढरकवडा ४५, पुसद २७, आर्णी दहा, दारव्हा १, दिग्रस ७, महागाव १२, मारेगाव २, नेर ३, उमरखेड २ तर वणी तालुक्यात १० कोरोना रुग्ण मंगळवारी वाढले.

ठळक मुद्दे१९४ रुग्ण वाढले : दोन महिन्यात २६७ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच मृत्यूचा कहर बरसविणाऱ्या कोरोनाने सप्टेंबर संपता-संपताही बळी घेतलेच. मंगळवारी आणखी आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या महामारीत आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या तब्बल २६७ पर्यंत वाढली आहे.दगावलेल्या आठ जणांमध्ये यवतमाळातील दोघांसह वणी, पुसद, महागाव, राळेगाव आणि बाभूळगावमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. इतर सात जण पन्नाशी-साठीच्या पुढच्या वयाचे असले तरी महागाव तालुक्यातील अवघ्या ३० वर्षाच्या तरुणाचाही मृतकांमध्ये समावेश आहे.मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागातील रहिवासी असलेल्या तब्बल १९४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १२७ पुरुषांसह ६७ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी यवतमाळ शहरातील ४९ पुरुष, २१ महिला व तालुक्यातील तीन पुरुषांसह दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पांढरकवडा ४५, पुसद २७, आर्णी दहा, दारव्हा १, दिग्रस ७, महागाव १२, मारेगाव २, नेर ३, उमरखेड २ तर वणी तालुक्यात १० कोरोना रुग्ण मंगळवारी वाढले.जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत तब्बल आठ हजार ४७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात २७५ रुग्ण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत ७४ हजार ७१३ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६५ हजार २२० नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर १०२३ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.रुग्णसंख्येवरून प्रशासनात बेबनावदररोज किती रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, किती अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, याबाबतची संख्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वैद्यकीय महाविद्यालयाला व तेथून जिल्हा प्रशासनाला मिळाल्यावर ही संख्या प्रसिद्धी माध्यमांना कळविली जाते. मात्र मंगळवारी डिस्चार्ज आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलीच नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले. यावरून रुग्णसंख्या आणि त्यांच्या नोंदीबाबत प्रशासनातच बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या