शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

सात महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 28, 2016 01:10 IST

शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही.

अभियान कुचकामी : बँका धरताहेत वेठीस महागाव : शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही. गत सात महिन्यात महागाव तालुक्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बळीराजा चेतना अभियान आणि अन्न सुरक्षा योजनाही तालुक्यात कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. महागाव तालुक्यात तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा शेतकऱ्यांमध्ये आत्मसन्मान दाखविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गहू, तांदूळ अत्यल्प दरात दिले जाते. परंतु आजही महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचला नाही. परिणामी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्यांची कारणे शोधली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अपवाद वगळता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात डाळदाणा आढळून आला नाही. शेतातील पिकांच्या फवारणीसाठी पैसा नाही. सावकाराचे कर्ज अंगावर असणे, बँका कर्ज द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथील किसन भागोराव नरवाडे या शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. पूर्वीचे कर्ज वसूल करून घेतल्यानंतर बँक कर्जाचे पुनर्गठन करायला तयार नाही. त्यामुळे खचून गेलेल्या किसनने इच्छा मरणाची मागितली होती. शासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तालुक्याला तीनदा भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तालुक्यात फेल ठरल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)