शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

‘झिरो’ऐवजी ‘ओ’ दाबल्याने यवतमाळ जिल्ह्यातील तुरीचे चुकारे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 7:05 PM

शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे चुकारे जमा करताना संगणक आॅपरेटरने झिरोऐवजी ओचे बटन दाबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न होता ते परत गेले.

ठळक मुद्देआॅनलाईनचा फटकाशेतकरी चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पारदर्शक आणि गतीमान कारभारासाठी आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. मात्र ही प्रणाली अप्रशिक्षित माणसांच्या हाती गेली की काय होते, याचा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे चुकारे जमा करताना संगणक आॅपरेटरने झिरोऐवजी ओचे बटन दाबले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न होता ते परत गेले.राज्यभरातील तूर खरेदीची माहिती गोळा करणारे मुंबईचे आयटी हब सेंटर काही दिवसांपूर्वी जळाले. यात महत्त्वाचा डाटा प्रभावित झाला. त्यामुळे काही दिवसांपासून आॅनलाईन यंत्रणा ठप्प पडली होती. तुरीच्या चुकाऱ्याची रक्कमही यात अडकली होती. आता हा गोंधळ सुटण्यास प्रारंभ झाला. असे असताना अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे नवा गोंधळ पुन्हा उभा झाला आहे. बाभूळगाव येथील तूर खरेदी केंद्रावर संगणकावर झिरोऐवजी ओ दाबल्याने तुरीचे चुकारे परत गेले. शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकातील शून्य टाईप करताना शून्य टाईप करण्याऐवजी ओ असे टाईप केल्याने ते खाते क्रमांक पडताळणीत चुकीचे दाखवले गेले व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. राळेगावातही असाच प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत तूर विकली होती. त्याचे पैसे एप्रिलमध्ये आले. परंतु संगणकचालकाच्या अज्ञानाने तेही परत गेले. पैसे परत का गेले, याची माहिती बाभूळगाव व राळेगाव केंद्राला कळत नव्हती. आयटी विभागाने सोमवारी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर पैसे का जमा झाले नाही, याची माहिती घेतली तेव्हा हा घोळ पुढे आला. आता पैसे मिळण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.कर्जमाफीला बसला होता स्पेसचा फटकाशासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीला संगणकाच्या स्पेसचा फटका बसला होता. जिल्हा बँकेला कर्जाचा निधी ब्रँचकडे वळता करताना नंबरमध्ये एक स्पेस अधिक सुटली. या छोट्याशा चुकीने शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम परत गेली होती. ही रक्कम मिळविण्यासाठी आयटी विभागाकडे संपर्क साधावा लागला. हा अनुभव पाठीशी असतानाही तूर चुकाऱ्यातही हीच परिस्थिती निर्माण झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी