शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्यावरून पुसदमध्ये आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: May 16, 2016 02:43 IST

शहराला होणारा पाणी पुरवठा शुद्ध की अशुद्ध असा वाद शहरात निर्माण झाला असून पुसद विकास मंच पाणी अशुद्ध असल्याचा दावा करीत आहे.

नगरपरिषद विरुद्ध विकास मंच : पाणीपुरवठा सभापती म्हणतात, पाणी शुद्धच !पुसद : शहराला होणारा पाणी पुरवठा शुद्ध की अशुद्ध असा वाद शहरात निर्माण झाला असून पुसद विकास मंच पाणी अशुद्ध असल्याचा दावा करीत आहे. तर नगर परिषद पाणी पिण्यायोग असल्याचे सांगत आहे. पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत विकास मंचने खासगी पाणी विक्रेत्यांकडून सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. पुसद शहराला पाणी पुरवठा करणारे पूस प्रकल्प अवघे दोन टक्के पाणी शिल्लक आहे. शहरात पाणी दुर्गंधी युक्त आणि अशुद्ध येत असल्यावरून सध्या शहरातील राजकारण तापले आहे. पुसद विकास मंचने गत आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन एका खासगी प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला होता. त्यात पुसद शहरातील पाणी पुरवठा पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले होते. या पाण्यामुळे आजाराची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेनंतर पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी नगराध्यक्षांच्या कक्षात पत्रकार परिषद घेत, पुसद विकास मंचचा दावा खोडून काढला.पुसदकरांना २००४ पासून पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यावेळी आरोप करणाऱ्याचे वडील नगराध्यक्ष होते. तेव्हा आम्ही राजकारण केले नाही, असे सभापती राजू दुधे म्हणाले. शहराच्या प्रत्येक वार्डात माझ्या शेतातून टँकरने पाणी पुरवठा केला होता. आज महाराष्ट्रात पाणी टंचाई भीषण झाली आहे. पुसद शहरही पाण्यासाठी व्याकूल झाले आहे. अशा वेळी नगरपालिकेला किंवा संबंधित विभागाला कोणतीही तक्रार न करता खासगी प्रयोगशाळेतील अहवाल आणून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण करणे, योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले, मात्र ते त्यांनी कोठून घेतले हे गौडबंगाल आहे. पाण्याचे नमुने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यासमक्ष घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करता परस्पर नमुने पाठवून त्याचा अहवाल लोकांपर्यंत मांडणे म्हणजे दिशाभूल आहे. पुसद नगर परिषद दरमहा शहरातील विविध भागातील ४० पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतात. यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेत त्याची तपासणी होते. परंतु अद्यापही पिण्यास अयोग्य असा अहवाल प्राप्त झाला नाही. पुसद विकास मंच केवळ खासगी पाणी विक्रेत्यांना मदत व्हावी यासाठीच हा प्रकार करीत असल्याचे राजू दुधे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. मो. नदीम, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाळे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)