शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

बाबासाहेबांच्या ‘नदी जोड’कडे दुर्लक्ष झाल्यानेच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:38 PM

सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नोंदविले.

ठळक मुद्देरामदास आठवले : दुष्काळी गावात भेट, शहिदाच्या कुटुंबाला पाच लाख

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नोंदविले.शुक्रवारी दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आठवले जिल्ह्यात आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जाम गावात पाहणी केली. तेथे वीजबिल थकित असल्याने गावाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. लोकांनी ही व्यथा आपल्यापुढे मांडली. अशीच स्थिती अनेक गावात आहे. आता या दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देताना, अशा गावांचे वीजबिल माफ करण्याची मागणी करणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ हटविण्यासाठी केंद्रातून निधी मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण कायमस्वरुपी उपाय बाबासाहेबांच्या नदी जोड कार्यक्रमातूनच होणार आहे. मुंबई, कोकण या भागात अधिक पाऊस पडतो. तेथील नद्यांचे पाणी अडवून कमी पाऊस पडणाºया विदर्भ-मराठवाड्यातील नद्यांमध्ये सोडले जावे. विदर्भातही आणखी मोठे डॅम बांधण्याची गरज आहे.दरम्यान, दुष्काळी गावांची पाहणी करतानाच त्यांनी आर्णी तालुक्यातील तरोडा गावाला भेट दिली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या आग्रमन रहाटे यांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे पाच लाखांची मदत आठवले यांनी जाहीर केली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी रहाटे कुटुंबीयांनी केल्याची माहिती आठवले यांनी दिली. आता गडचिरोलीतील डीवायएसपींचीही चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करू, असे आठवले म्हणाले.जलयुक्त शिवार फेलस्वातंत्र्याला ७२ वर्ष होत असतानाही जनता पिण्याच्या पाण्यासाठी भटकत आहे. हे चांगले नाही. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार सुरू केले. तरी आजही पाणीटंचाई दिसत आहे. हे जलयुक्त शिवार फेल झाल्याचेच लक्षण आहे. पण यापूर्वीच्या सरकारनेही बाबासाहेबांच्या नदी जोड कार्यक्रमावर लक्ष दिले नाही. जे माणसं जोडू शकले नाही, ते नद्या काय जोडतील, अशा शेलक्या शब्दात आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर संधान साधले.उमरखेड विधानसभा मतदारसंघावर रिपाइंचा दावालोकसभेसाठी एकही जागा लढवली नसली, तरी विधानसभा रिपब्लिकन पार्टी लढवणार आहे. विशेषत: उमरखेडची जागा रिपाइंसाठी मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, मोहन भोयर, सुधाकर तायडे, आर.एस.वानखडे, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रभाकर जीवने, अ‍ॅड. जीवने, कल्पना मेश्राम, नवनीत महाजन उपस्थित होते.नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी बनावेनक्षलवाद हा कधीही दलित-आदिवासींना न्याय देऊ शकत नाही. त्यासाठी लोकशाही मार्गाने सत्ता मिळविणे हाच पर्याय आहे. उलट नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादी बनावे. हिंसेने कोणाचेच भले होत नाही. ते शांततेच्या मार्गाने मुख्य प्रवाहात येणार असतील, तर त्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेwater shortageपाणीटंचाई