मद्यधुंद ३ तरुणींची दोघांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:42 AM2024-03-04T10:42:22+5:302024-03-04T10:43:16+5:30

या प्रकाराचा व्हिडीओ शुक्रवारपासून समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला.

Drunk 3 young women beat up two | मद्यधुंद ३ तरुणींची दोघांना मारहाण

मद्यधुंद ३ तरुणींची दोघांना मारहाण

कळंब (यवतमाळ) : त्या तिघी ये-जा करणाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत होत्या. मध्यस्थी करणाऱ्यांवरही हात उचलत होत्या. एवढेच नाही तर दोनजणांना त्यांनी मारहाण केली. हा प्रकार कळंब (जि.यवतमाळ) येथील बसस्थानक परिसरात घडला. या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. 

दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ शुक्रवारपासून समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे शनिवारी कळंब पोलिसांनी दखल घेत तीनही युवतींना यवतमाळवरून कळंब पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली, असल्याचे सांगण्यात आले. परंतु या प्रकारामुळे कळंबवासी चांगलेच हैराण आणि भयभीत झाले आहे. विशेष म्हणजे या तीनही युवतींनी अतिमद्यप्राशन करून मोठी रहदारी असलेल्या रस्त्यावर दादागिरी करणे सुरू केले होते. हमरस्त्यावर सर्वांदेखत धिंगाणा घालणे सुरू असताना तातडीने पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते.
 

Web Title: Drunk 3 young women beat up two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.