शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

घराच्या स्वप्नांना महागाईचा डंख, व्यापारी संकुलाच्या दरातही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन युद्धस्थिती, यामुळे स्टिलच्या दरात ९० टक्के, तर सिमेंटच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीट, वाळू, प्लास्टिक पाइप, ॲल्युमिनियमच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिझेल व पेट्रोल दरातील वाढीमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. एकीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडत असताना दुसरीकडे बरेचसे परप्रांतीय मजूर कोरोना काळानंतर महाराष्ट्रात परत आले नाही. 

संतोष कुंडकरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या पाच महिन्यांत बांधकाम साहित्याचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे नवीन घर खरेदी करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. केवळ घरच नाही, तर व्यावसायिक सदनिकांसाठीही आता ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ महिनाभरात अचानकपणे दुप्पट झाली. त्यामुळे निवास आणि व्यापारी सदनिकांचे दर प्रति चौरस फूट ५०० ते ७०० रुपये वाढणार आहे. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन युद्धस्थिती, यामुळे स्टिलच्या दरात ९० टक्के, तर सिमेंटच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीट, वाळू, प्लास्टिक पाइप, ॲल्युमिनियमच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिझेल व पेट्रोल दरातील वाढीमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. एकीकडे बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडत असताना दुसरीकडे बरेचसे परप्रांतीय मजूर कोरोना काळानंतर महाराष्ट्रात परत आले नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मजूर टंचाई आणि मजुरीत वाढ, यालाही तोंड द्यावे लागत आहे. रेरा कायद्यानुसार आधी बुकिंग केलेल्या फ्लॅटधारकाला कोणतीही दरवाढ न करता मुदतीत फ्लॅट ताब्यात देण्याचे बंधन विकासकावर असते. मात्र, बांधकाम साहित्याच्या दरवाढीवर शासन कोणतेही निर्णय आणत नाहीत. दरवाढ टाळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत; परंतु सध्या तरी नवीन बुकिंग करण्यासाठी आणि नवीन प्रकल्पासाठी दरवाढ अनिवार्य असल्याचे येथील क्रेडाई (वणी बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स असो.) चे अध्यक्ष किरण दिकुंडवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

या सर्व दरवाढीचा परिणाम बांधकाम उद्योगावर झाला असून बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, बांधकाम खर्चाच्या दरात प्रति चौरस फूट ५०० ते ७०० वाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सरकारही या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी काहीच करत नाही.   - किरण दिकुंडवार, अध्यक्ष, क्रेडाई.

 

टॅग्स :warयुद्ध