शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

विधानपरिषदेचे स्वप्न भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 6:00 AM

कोणत्याही मार्गाने विधानपरिषद सर करण्याकरिता पुसदमधील दोन आणि उमरखेडमधील एका नेत्याने चांगलीच कंबर कसली होती. विधानपरिषदेचे सदस्य अ‍ॅड.नीलय नाईक विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होतील आणि त्यांच्या जागी तुमचा विचार केला जाईल, असा शब्द भाजपच्या नेत्यांनी त्यांनी दिला होता. यामुळे विधानपरिषदेच्या शर्यतीमध्ये असलेले इच्छुक अ‍ॅड.नीलय नाईक विजयी व्हावे म्हणून देव पाण्यात घालून बसले होते.

ठळक मुद्देअनेकांचा हिरमोड : पुसद, उमरखेडमध्ये निर्माण झाला सन्नाटा

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने विधानपरिषदेची जागा रिक्त होईल आणि त्या ठिकाणी आपला नंबर लागेल, या आशेने अनेकांनी आपला परफॉर्मन्स दाखविण्यासाठी काम केले. रिंगणात उतरलेले दिग्गज मात्र अपेक्षित निकाल न लागल्याने खिन्न झाले. पपरिणामी विधानपरिषदेवर जाण्याचे अनेकांचे स्वप्नही भंगले.कोणत्याही मार्गाने विधानपरिषद सर करण्याकरिता पुसदमधील दोन आणि उमरखेडमधील एका नेत्याने चांगलीच कंबर कसली होती. विधानपरिषदेचे सदस्य अ‍ॅड.नीलय नाईक विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होतील आणि त्यांच्या जागी तुमचा विचार केला जाईल, असा शब्द भाजपच्या नेत्यांनी त्यांनी दिला होता. यामुळे विधानपरिषदेच्या शर्यतीमध्ये असलेले इच्छुक अ‍ॅड.नीलय नाईक विजयी व्हावे म्हणून देव पाण्यात घालून बसले होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना भाजपने विधानपरिषद देऊ केल्याची चर्चा भाजपच्या गोटात होती. या दोघांनाही अ‍ॅड.नीलय यांनी मदत करावी, त्या बदल्यात त्यांना विधानपरिषद बहाल केली जाईल, असा शब्द दिल्याचे सांगितले गेले. त्यामुळेच की काय डॉ.फुपाटे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद मैंद यांनी पडद्याआड बऱ्याच घडामोडी केल्याचे सांगितले जाते. या दोन्ही नेत्यांनी परिश्रम करूनही भाजपाला विजयश्री खेचून आणता आली नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची आघाडी त्यांनी खरोखर रोखून धरल्याचे निकालावरून दिसून आले.तथापि, पुसदकरांनी आजपर्यंत विरोधकांचे नेतृत्व नाकारलेले दिसते. त्यांचा ‘बंगल्या’वर विश्वास असल्याचे अनेक निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले. डॉ.फुपाटेच नव्हे, तर अनेकांनी बंगल्याला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले. एकेकाळी बंगला विरुद्ध ‘हवेली’ असे समीकरण प्रचंड गाजले होते. परंतु बंगल्याचे अस्तित्व हवेलीला कमी करता आले नाही. अखेर हवेलीने नमते घेत बंगल्याचा विरोध करण्याचा नादच सोडून दिला. बंगल्याला विरोध करणे म्हणजे सोप्या भाषेत दगडावर मुंडकं आपटण्यासारखे आहे, हे ज्यांना कळते ते जुने जाणकार मात्र बंगल्याच्या अवतीभवती नेहमी फिरत असतात. अ‍ॅड.नीलय नाईक यांच्या पराभवात उदयाला येऊ पाहणारे नवे नेतृत्व अस्ताला गेले आहे. विधानपरिषदेचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.रिक्त होणाºया जागेवर अनेकांचे लक्षदुसºया बाजूला शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य प्रा.तानाजी सावंत विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांची जागा रिक्त होण्याची प्रतीक्षा उमरखेड मतदारसंघातील येथील अनेकांना लागली आहे. या रिक्त जागेवर डोळा ठेवून अनेक जण कामाला लागले आहे. वरिष्ठांकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र तूर्तास ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे, हे विशेष.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ