शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून विधवेचा विळ्याने खून

By admin | Updated: December 31, 2016 01:06 IST

अनैतिक संबंधाच्या कारणावरून विधवा महिलेचा विळ्याचे वार करून निर्घृण खून करण्यात

सासू, दिराला अटक : प्रियकराला फसवू पाहणारा फिर्यादीच निघाला आरोपी
हिवरासंगम : अनैतिक संबंधाच्या कारणावरून विधवा महिलेचा विळ्याचे वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना महागाव तालुक्याच्या हिवरासंगम येथे शुक्रवारी उघडकीस आली.
वंदना उर्फ अनिता अशोक चवरे (३०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तिचा दीर पिंटू उर्फ प्रकाश दगडू चवरे व सासू सिंधूबाई दगडू चवरे यांना महागाव पोलिसांनी खुनाच्या आरोपात अटक केली. गुरुवारी रात्रीच अनिताचा खून करण्यात आला. शुक्रवारी पहाटे अनिताचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत तिच्याच अंगणात आढळून आला. तिच्या अंगावर विळ्याचे वार करण्यात आले होते. हा विळा तिच्या मृतदेहाशेजारीच पडून होता. अनिताचा दीर प्रकाश चवरे याने महागाव पोलिसांकडे खुनाच्या या घटनेची सकाळीच फिर्याद नोंदविली. शिवाय या खून प्रकरणी अनिताचे अनैतिक संबंध असलेल्या गावातीलच बंडू वारंगे याच्यावर संशय व्यक्त केला. महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रक्ताचे डाग प्रकाशच्या घरापर्यंत आढळून आले. त्यामुळे पोलिसांना प्रकाशवर संशय बळावला. अखेर ‘बाजीराव’ दाखविताच प्रकाशने गुन्हा कबूल केला आणि खुनाच्या या प्रकरणात मृताच्या प्रियकराला फसवू पाहणारा फिर्यादी दीरच आरोपी निघाला. पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, अनिता चवरे हिच्या पतीने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सासू सोबत पटत नसल्याने ती मुलगा देवानंद (९) व मुलगी ऋतुजा (७) यांच्यासह शेजारीच वेगळी राहत होती. त्यांच्या बाजूलाच सासू व दीर राहत होते. अनिताचे गावातीलच बंडू काळूराम वारंगे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा सासूला संशय होता. याच कारणावरून सासू-सुनेचे नेहमी भांडण व्हायचे. सासूने या अनैतिक संबंधाबाबतचा संशय तंटामुक्त समितीकडे लेखी स्वरूपात व्यक्त केला होता. दरम्यान गुरुवारच्या रात्री अनिताचा खून करण्यात आला. तिची मुलगी या खुनाची साक्षीदार असावी, असा पोलिसांना संशय आहे. सकाळी खून झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तपास चक्रे फिरवून महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी खुनाचा छडा लावला आणि दोनही आरोपींना गजाआड केले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, फौजदार पावरा, बिट जमादार देवाशिष पवार, पोलीस कर्मचारी युवराज जाधव, प्रशांत, सुरेश पवार, महिला पोलीस शिपाई किरणताई आडे आदी या तपासात मदत करीत आहे. (वार्ताहर)