धीर सोडू नका ! शासन तुमच्या पाठीशी आहे -आमदार अशोक उईके
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:19 IST2017-10-14T11:18:28+5:302017-10-14T11:19:29+5:30
राळेगाव विधानसभा क्षेत्रातील कळंब येथील देविदास मडावी या मजुराचा विष बाधेने मृत्यू झाला.

धीर सोडू नका ! शासन तुमच्या पाठीशी आहे -आमदार अशोक उईके
यवतमाळ - राळेगाव विधानसभा क्षेत्रातील कळंब येथील देविदास मडावी या मजुराचा विष बाधेने मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी सांत्वन पर भेट देऊन शासनाच्या आर्थिक मदतीच्या दोन लाख रुपयाचा धनादेशाचे वितरण केले. तेव्हा परिवारीची स्थिती बघून आमदार उईके भावना विवंश झाले.
देविदास मडावी यांचे कुटुंब भूमिहीन आहे. त्यामुळे ते मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करत होते. त्यातच आता दिवाळी तोंडावर असल्यामुळे ते गावातील गुरनुले यांच्याकडे फवारणीसाठी रोजनदारीने गेले होते. फवारणी दरम्यान त्यांना विषबाधा झाली. त्या नंतर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने त्यांचा बारादिवसनंतर मृत्यू झाला.
विष बाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या परिवारासाठी शासनाने 2 लाख रुपयाच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. हा धनादेश आज आमदार अशोक उईके यांनी मडावी परिवाराला सुपुर्द केला. या वेळी विभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार रणजित भोसले, भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, आर्थिक अडचणीत सापडलेल्या या परिवाराला शासनाच्या आर्थिक मदत येण्याआधीच आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी कुटुंबाला स्वतःकडून आर्थिक आधार दिला.