शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी ८ वाजताच दुकाने उघडली. नागरिक बाजारपेठेत बिनधास्त वागत होते. यामुळे प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसून आले. सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आदी परिसरात नागरिक बिनधास्त वावरत होते. दुचाकीवरून डबल सीट फिरतानाही अनेकजण आढळले. ऑटोरिक्षाही बिनधास्त धावत होत्या.

ठळक मुद्देसकाळीच दुकाने उघडली : नागरिक बिनधास्त, संचारबंदीला खोडा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची घोषणा केली. मात्र पहिल्याच दिवशी पुसदमध्ये दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली. सकाळी ८ वाजता दुकाने उघडण्यात आली.पुसद शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे १५ ते २१ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी यापूर्वीच लॉकडाऊन घोषित केला होता. तथापि पालकमंत्र्यांनी यवतमाळात झालेल्या बैठकीत केवळ पुसदमध्येच लॉकडाऊन का, उर्वरित जिल्ह्यात लॉकडाऊन का नाही असा प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण जिल्ह्यात एकच नियमावली लागू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत सर्व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचा निर्णय घोषित केला. त्याला पहिल्याच दिवशी येथे हरताळ फासण्यात आला.महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी ८ वाजताच दुकाने उघडली. नागरिक बाजारपेठेत बिनधास्त वागत होते. यामुळे प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसून आले. सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आदी परिसरात नागरिक बिनधास्त वावरत होते. दुचाकीवरून डबल सीट फिरतानाही अनेकजण आढळले. ऑटोरिक्षाही बिनधास्त धावत होत्या. प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.२९ नागरिक डीसीएचसी सेंटरमध्ये क्वारंटाईनएकूण कोरोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहोचली. त्यापैकी २३ जण अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह, तर १४ जण कोरोनामुक्त झाले. एकाचा मृत्यू झाला. रुग्णांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, परिचारिका, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. शेंबाळपिंपरी, संभाजीनगर, अरुण ले-आऊट, गढी वॉर्ड व दिग्रसचे २९ नागरिक डीसीएचसी सेंटरमध्ये क्वारंटाईन आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या