शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

कोरोना महामारीच्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कशा घ्याव्या याची नियमावली आयोग पुढील तीन दिवसात जारी करणार आहे. त्याच पद्धतीने सहकारातील निवडणुकाही घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घेतली जात आहे. न्यायालयाने ३१ मार्च २०२० पूर्वी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

ठळक मुद्देप्राधिकरणाने माहिती मागितली : मतदारसंख्या, मतदान बुथबाबत विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या पाच महिन्यांपासून लांबणीवर पडलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याच्या पुणे येथील सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बँकेसंबंधी स्थानिक सहकार प्रशासनाला माहिती मागितली आहे.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण मतदार किती, त्यांची तालुकानिहाय संख्या, त्यानुसार कुठे किती मतदान बुथ लागणार आदी मुद्यांवर ही माहिती मागितली गेली आहे. त्यानुसार १५ तालुक्यांच्या ठिकाणी एकाच मतदान बुथवर काम होणार आहे. कारण तेथील मतदारांची संख्या शंभरच्या आत आहे. तर यवतमाळ तालुक्यात ही संख्या दीडशेच्या घरात जात असल्याने येथे दोन किंवा तीन मतदान बुथ ठेवले जाण्याची शक्यता आहे. मतदानावर फोकस निर्माण केला गेल्याने प्राधिकरण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे.कोरोना महामारीच्या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कशा घ्याव्या याची नियमावली आयोग पुढील तीन दिवसात जारी करणार आहे. त्याच पद्धतीने सहकारातील निवडणुकाही घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घेतली जात आहे. न्यायालयाने ३१ मार्च २०२० पूर्वी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ मार्चला मतदान घेतले जाणार होते. परंतु त्याच्या दोन दिवस आधीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली. जिल्हा बँक निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. कोरोनामुळे निवडणुकीला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली गेली होती. मात्र त्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने बँकेची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रक्रिया राबविली गेल्याचे सांगितले जाते.सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बँकेच्या मतदारसंख्या व मतदान बुथबाबत माहिती मागितली आहे. ती पाठविली जात आहे. प्राधिकरणाचा लगतच्या काळात निवडणूक घेण्याचा मानस दिसतोय.- राजेश दाभेरावविभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) अमरावती.

टॅग्स :bankबँक