कर्तव्यावरील पोलिसांना व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:02+5:30

शहर पोलीस ठाणे, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा, अवधूतवाडी पोलीस ठाणे व कमांडो बांधवांना या औषधीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार, सचिव नीलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडवार, प्रसिद्धी प्रमुख विजय बुंदेला, अविनाश जिड्डेवार, काशीनाथ ब्राह्मणे आदींनी या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

Distribution of vitamin pills to the police on duty | कर्तव्यावरील पोलिसांना व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप

कर्तव्यावरील पोलिसांना व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना व्हायरसमुळे मागील १२ दिवसांपासून संपूर्ण यवतमाळ शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. चौकाचौकात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधव तैनात आहे. त्यांना यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनच्यावतीने पाच हजाराहून अधिक व्हिटॅमिन-सी, लिम-सी ५०० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
चौकाचौकात सेवेवर असलेल्या तसेच यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडणाऱ्या आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शहर पोलीस ठाणे, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा, अवधूतवाडी पोलीस ठाणे व कमांडो बांधवांना या औषधीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार, सचिव नीलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडवार, प्रसिद्धी प्रमुख विजय बुंदेला, अविनाश जिड्डेवार, काशीनाथ ब्राह्मणे आदींनी या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of vitamin pills to the police on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.