शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा प्रकल्पाचे वाभाडे

By admin | Updated: November 11, 2014 22:48 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी

शिवानंद लोहिया - हिवरीराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी विभागाने द्यायला हवे. मात्र या धोरणाला हरताळ फासत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. बाजारात दोन हजार रुपये किमतीचे असलेले हरभरा बियाणे कृषी विभागामार्फत त्यातही शासनाच्या योजनेतून ३ हजार ३५० रुपये किमतीत विकले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. हा प्रकल्प राबविल्या जाणाऱ्या गावांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून जनहिताची ही योजना जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ तालुक्यातही तीन ठिकाणी ही योजना राबविली जात आहे. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, वरूड, मंगरूळ या तीन गावांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित आणि परिसरातील गावांमध्ये सध्या रबी पीक लागवडीच्या तोंडावर हरभरा बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. या प्रकल्पामार्फत हरभरा बियाण्यांसह रसायनांची किटच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र अव्वाच्या सव्वा दराने या किट कृषी विभागामार्फत विकल्या जात आहे. ८० किलो हरभरा बियाणे, १० किलो झिंक सल्फेट, १० किलो फेरस, एचएनपीव्ही २५० ग्रॅम, एक लिटर निंबोळी अर्क, रायझोबियम, ट्रायकोट्राका आदी रसायनांचा या कीटमध्ये समावेश आहे. वास्तविक बाजारात ८० किलो हरभरा बियाणे हे जास्तीत जास्त एक हजार ४०० रुपयांत होते. शिवाय झिंक सल्फेट आणि फेरस हे १० किलो प्रत्येकी ४०० ते ५०० रुपयादरम्यान उपलब्ध आहे. या शिवाय रायझोबियम, एचएनपीव्ही, निंबोळी अर्क आणि ट्रायकोट्राका हे २०० ते ३०० रुपये किमतीत उपलब्ध होते. दोन हजार ५०० रुपयात या सर्व वस्तू बाजारात उपलब्ध होत असताना शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पामार्फत मात्र ३ हजार ३५० रुपयांमध्ये कुठलेही अनुदान न देता विकल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभाकडे पाठ फिरवली आहे. बोटावर मोजण्याइतके शेतकरी सोडले तर कुणाचाही हे बियाणे खरेदी करण्याकडे कल नसल्याचे दिसून येते.