Distribution of bamboo and teak saplings to farmers by the Minister of Forests and Agriculture | वनमंत्री अन् कृषिमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांबू, सागवानच्या रोपांचे वाटप

वनमंत्री अन् कृषिमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांबू, सागवानच्या रोपांचे वाटप

यवतमाळ: राज्यात वन महोत्सव - 2020 ला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने वनमंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वणी तालुक्यातील मंदर येथील नर्सरीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांना बांबू आणि सागवानच्या रोपांचे वाटप करण्यात आले.  वणी तालुक्यातील मंदर या वनविभागाच्या रोपवाटिकेत वनमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अटल आनंद घनवनचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, उपवनसंरक्षक के. अभर्णा, माजी आमदार विश्वास नांदेकर आदींनी वृक्षांची लागवड केली.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सागवान व बांबूचे रोप वाटप करण्यात आले. यात वांजरी येथील श्रीराम परचाके, माणकी येथील रामभाऊ गाऊत्रे, निंबाळा येथील अतुल हिवरकर, पठारपूर येथील विजय गेडाम, कायर येथील कुंदन टोंगो, कविता गारगाटे,  अलका कोरवते, शांताराम बोंडले, अनिल उपरे, संदीप जुमनाके, आकाश पावले, भाविक परचाके आदींचा समावेश होता. सहाय्यक वनसंरक्षक अनंत दिघोळे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, आशिष कुळसंगे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार  धनमाने, एस. एन. पांधरे उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of bamboo and teak saplings to farmers by the Minister of Forests and Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.