Diseases of the disease in the district | जिल्ह्यात साथरोगाचे थैमान
जिल्ह्यात साथरोगाचे थैमान

ठळक मुद्देरूग्णालये हाऊसफुल्ल । डेंग्यूचे १३३, स्क्रब टायफसचे दोन तर मलेरियाचा एक रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सततचे ढगाळी वातावरण, अवेळी बरसणारा पाऊस, साचलेले पाणी आणि वस्त्यामध्ये वाढलेले गवत यामुळे जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यातून डेंग्यू, मलेरिया, स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले आहे. यात डेंग्यूचे प्रमाण मोठे आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे छोट्या मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे.
गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे १६० पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. तर सप्टेंबरमध्ये १३० रूग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य विभागाची यंत्रण सजग झाली आहे. सतत ताप येणाऱ्या रूग्णांची डेंग्यू चाचणी प्राधान्याने केली जात आहे. त्यानंतरच उपचार केला जात आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सावरता येत आहे. यातून सुुदैवाने कुठलाही रूग्ण दगावला नाही.
डेंग्यूसोबतच मलेरियाचा एक रूग्ण सप्टेंबरमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे. तर स्क्रब टायफस या आजाराचे दोन पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. राळेगाव आणि आर्णी तालुक्यात हे रूग्ण सापडले आहेत. उपचाराअंती या रूग्णांना त्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या तपासण्यांसाठी खासगी पॅथॉलॉजींचे नाव सूचविले जाते. त्याऐवजी शासकीय रुग्णालयात या तपासण्या केल्यातर रुग्णांचा खर्च वाचू शकतो. मात्र खासगी रुग्णालयातील शासकीय डॉक्टर तसा उपाय सूचवित नाही. यामुळे रुग्णांच्या उपचारावरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकारापासून रुग्णांनी सावध होण्याची नितांत गरज आहे. तरच साथ नियंत्रणात येणार आहे.
फॉगिंंग मशिनच उपलब्ध नाही
जिल्ह्यात साथरोगाला नियंत्रित करण्यासाठी नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून फॉगिंग मशिन लावणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात नगरपरिषदेकडे या मशिन असल्या तरी त्याचा वापर होत नाही. ग्रामपंचायतीकडे अशा मशिनच उपलब्ध नाही. यामुळे डासांचे प्रमाण घटले नाही. त्यांचा उद्रेक वाढत चालला आहे. यातून सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे.
अवास्तव रक्त चाचण्या
प्रथमत: साध्या तापाचा औषधोपचार न करता थेट डेंग्यूच्या संशयाने रक्ताच्या चाचण्या घेण्याकरिता सांगितल्या जात आहे. यामुळे पॅथॉलॉजीचा खर्च वाढला आहे. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांनाच या चाचण्या करण्याचे सांगितले जात आहे. यातून रुग्णांच्या नातेवाईकांवर आर्थिक ताण वाढला आहे.

जिल्ह्यात डेंग्यूचे पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. या रूग्णाचे उपचार नियंत्रणात आहेत. यामुळे आजारामुळे दगावणाऱ्या रूग्णांची संख्या निरंक आहे. संपूर्ण यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे.
- संघर्ष राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी, यवतमाळ

Web Title: Diseases of the disease in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.