शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

सोनखास परिसरात साथरोग

By admin | Updated: September 25, 2014 23:35 IST

नेर तालुक्यातील गावागावात सध्या साथरोगांचे थैमान माजले असून प्रत्येक घराघरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आरोग्य विभाग मात्र यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

पांडूरंग भोयर - सोनखासनेर तालुक्यातील गावागावात सध्या साथरोगांचे थैमान माजले असून प्रत्येक घराघरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आरोग्य विभाग मात्र यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. नेर तालुक्यातील आरोग्य विभागातून रुग्णांना मिळणारी सेवा पाहता आरोग्य विभागच सलाईनवर असल्याचे दिसून येते. गावागावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते, याकडे सबंधित ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. शासकीय स्तरावरून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाही. ग्रामिण जनतेमध्ये जनजागृती करण्याचे कामसुद्धा नियमितपणे होत नाही. वरिष्ठांचा कोणताही अंकुश शासकीय यंत्रणेवर दिसून येत नाही. या सर्व कारणांमुळे गावागावात साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या आजारांची लागण लवकर होत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. डायरिया, मलेरिया, टायफाईड तेच डेंग्यूसदृश्य आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्वरित व योग्य सेवा अशा रुग्णांना मिळत नसल्याने त्यांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयातून क्षुल्लक कारणांसाठी यवतमाळला रेफर करण्यात येते. त्यामुळे गोरगरित रुग्णांना विनाकारण प्रवासभाड्याचा आर्थिक भूदंड व मानसिक त्रासही सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्यामुळे तुलनेने स्वस्त उपचार मिळणाऱ्या सावंगी मेघे व सेवाग्राम (वर्धा) येथे उपचारासाठी अनेक रुग्ण जात आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले असून ग्रामपंचायती मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. गावातील सांडपाण्याच्या नाल्या व गटारांची नियमित सफाई होत नाही. पाण्यांच्या स्त्रोतांची दुरूस्ती होत नाही, उघड्यावर शौछास बसण्याऱ्यांमध्ये कोणतीजी जनजागृती करण्यात येत नाही, आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात आजार बळावले आहेत. ग्रामसेवकसुद्धा याबाबतीत कोणतीही काळजी घेताना दिसत नाही. गावातील लोकप्रतिनिधी सध्या गावातील कामे सोडून विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याचे दिसतात. पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांचेसुद्धा याकडे दुर्लक्ष असल्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद आहे. शासकीय यंत्रणा केवळ नावापुरतीच शिल्लक आहे. ‘सांग पाटला काय करू ही प्रवृत्ती बळावत आहे. कोणीही आत्मियतेने कर्तव्य बजावण्यास तयार नाही.