शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार सेवा सोसायट्यांचे संचालक बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

जिल्हा बँकेवर सेवा सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीला संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे सध्या सोसायट्यांच्या संचालकांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा लागली आहे. अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने मतदान घेण्याची वेळ सोसायट्यांवर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक निवडणूक : ‘बँक प्रतिनिधी’ म्हणून जाण्याच्या आशा मावळल्या, ‘जेटीं’च्या आदेशाने रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याकरिता बँकेवर प्रत्येक सोसायटीतून एक प्रतिनिधी पाठविला जातो. परंतु यावेळी थकबाकीदार असलेल्या सोसायट्यांचे प्रतिनिधी अपात्र ठरणार असल्याने आपसुकच बाद होणार आहे. त्याऐवजी आता थकबाकीदार नसलेल्या सभासदाला पाठविण्याचा पर्याय पुढे आला आहे.जिल्हा बँकेवर सेवा सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीला संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे सध्या सोसायट्यांच्या संचालकांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड स्पर्धा लागली आहे. अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने मतदान घेण्याची वेळ सोसायट्यांवर आली आहे. गेल्या १२ वर्षांपासून बँकेवर एकच संचालक मंडळ कायम आहे. या मंडळाने दोन नोकरभरत्या घेतल्या आहेत. या दोन्ही भरत्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजल्या आहेत. आता झालेली दुसरी भरती अद्याप पूर्णत्वास गेली नसली तरी त्यासाठी झालेला घोडेबाजार सर्वश्रृत आहे. गेल्या १२ वर्षात प्रचंड आर्थिक उलाढाल बँकेत झाल्याने या निवडणुकीत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गंगा वाहण्याची अपेक्षा आहे. त्याचे लाभार्थी होता यावे म्हणूनच सोसायट्यांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र जिल्हाभर पहायला मिळते. परंतु यावेळी विभागीय सहनिबंधकांच्या एका आदेशाने गोंधळ निर्माण झाला आहे. थकबाकीदार व्यक्ती अथवा संस्थेचा संचालक बँकेवर प्रतिनिधी म्हणून पाठविल्यास तो अपात्र ठरेल, त्याऐवजी थकबाकीदार नसलेला बँकेचा कुणीही सभासद प्रतिनिधी म्हणून पाठवावा असे या आदेशात नमूद आहे. पहिल्यांदाच ही अट घालण्यात आली आहे. त्यामुळे बँकेवर प्रतिनिधी म्हणून येऊ इच्छिणाऱ्या बहुतेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.जिल्ह्यात साडेपाचशे पेक्षा अधिक विविध कार्यकारी संस्था, आदिवासी संस्था व सेवा सहकारी सोसायट्या आहेत. सततच्या नापिकीमुळे यापैकी ९५ टक्के संस्था जिल्हा बँकेच्या थकबाकीदार आहेत. त्यामुळे या संस्थांवरील व्यवस्थापकीय संचालक मंडळामधून बँक प्रतिनिधी निवडले जाऊ शकत नाही आणि निवडले गेलेच असेल तर ते पुढे अपात्र ठरणार आहे. या आदेशामुळे जिल्हाभरातील सेवा सोसायट्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेक सोसायट्यांनी अद्याप बँक प्रतिनिधी निवडलेले नाही. सेवा सोसायट्यांचे संचालक राजकारणी असतात, निवडणुकीत ते अनेक डावपेच खेळतात, सर्वच मतदारांना होकार देतात त्यामुळे संचालकांना नेमक्या स्थितीचा अंदाज येत नाही. म्हणून या संचालक मंडळानेच सहकार प्रशासनाला हाताशी धरुन आदेशात ही जाचक अट समाविष्ठ करून घेतली नाही ना अशी शंकाही सहकार क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. कारण सोसायट्यांचे थकबाकीदार नसलेले सभासद बँक प्रतिनिधी म्हणून आल्यास त्यांना निवडणुकांचा तेवढा अनुभव नसतो व बँकेच्या संचालक मंडळासाठी त्यांचे मत मिळविणे सहज सोपे जाते म्हणून ही खेळी असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.‘कारवाई’ सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांवर, ‘लाभ’ मात्र सर्वांनाच हवा !सेवा सहकारी सोसायट्या तोट्यात आहेत. बहुतांश थकबाकीदार आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये तर फारशी उलाढालही नाही. अशा सोसायट्यांमध्ये किरकोळ अफरातफर झाली तरी थेट अध्यक्ष व सचिवावर गुन्हे नोंदविले जातात. त्यांनाच त्याचा सामना करावा लागतो. परंतु आता बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाताना या अध्यक्षाला मोठ्या मनाने तेवढे अधिकार दिले जात नाही. त्याऐवजी बँक प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड चढाओढ लागली आहे. ते पाहता कारवाईला अध्यक्ष-सचिव पुढे आणि लाभाच्या पदासाठी सर्वांचाच पुढाकार अशी स्थिती सोसायट्यांमध्ये निर्माण झाली आहे. संकटाला पुढे जाणाऱ्या अध्यक्षाला बँक प्रतिनिधी म्हणून जाण्यासही पुढे करावे, अशी मागणी अनेक सोसायट्यांमधून पुढे आली आहे.

टॅग्स :bankबँक