शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

एकूण कोरोनाबाधित नागरिकांपैकी २० जण उपचाराअंती बरे झाले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आता ५९ जणांवर यवतमाळात उपचार सुरू आहे. तत्पूर्वी विठ्ठलनगर येथील एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने एकूण दोन रुग्ण मृत्यू पावले आहे. यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे.

ठळक मुद्दे५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : २० नागरिक उपचाराअंती घरी परतले, एकूण ७९ बाधित रुग्ण'

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरासह तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. दर दिवशी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बुधवारी सकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र अद्याप प्रशासनाने त्याची अधिकृत घोषणा केली नाही. यातून दिग्रस शहर कोरोनाचे हॉट स्पॉट बनल्याचे दिसून येते.गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ७९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी २० जण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या ५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. त्यात शहरातील विठ्ठलनगर येथील एका ५५ वर्षीय व्यक्तचा यवतमाळ येथे बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. शहरातील काजीपुरा येथे २६, विठ्ठलनगर १७, घंटीबाबानगर एक, देवनगर दोन, बालाजीनगरी एक, बाराभाई मोहल्ला तीन, रूई एक, इसापूर चार, लाख (रायाजी) दोन, आरंभी एक आणि लायगव्हाण येथे एक अशा ७९ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.एकूण कोरोनाबाधित नागरिकांपैकी २० जण उपचाराअंती बरे झाले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आता ५९ जणांवर यवतमाळात उपचार सुरू आहे. तत्पूर्वी विठ्ठलनगर येथील एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने एकूण दोन रुग्ण मृत्यू पावले आहे. यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. शहरातील चार परिसर यापूर्वीच प्रतिबंधित करण्यात आले आहे.४४ नागरिक इसापूर येथे क्वारंटाईनतालुक्यातील इसापूर येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या संपर्कातील क्वारंटाईन व्यक्तींना ठेवले जात आहे. या सेंटरमध्ये तालुक्यातील ४४ नागरिकांना सध्या क्वारंटाईन केले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजेश वझीरे यांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या