शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते.

ठळक मुद्देशेती पिकाचे नुकसान : तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी, एसडीओंना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना खायलाही दाणा उरला नाही. परंतु शासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा शासनकर्त्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा खासदार सुरेश धानोरकर यांनी दिला. ते येथील एसडीओ कार्यालयासमोर तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित धरणे आंदोलनात बोलत होते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, या मागणीसाठी खासदार सुरेश धानोरकर, माजीमंत्रीव्दय अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, विजय पाटील चालबर्डीकर, मोहन मामीडवार, प्रकाश मानकर, जितेंद्रसिंह कोंघारेकर, घाटंजीचे सहदेव राठोड, कृषीभूषण रामकृष्ण पाटील, मनोज भोयर यांच्यासह अ‍ॅड.मोघे, प्रा.पुरके यांनी शासनाच्या धोरणावर जोरदार टिका केली.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिनूअण्णा नालमवार, जफर पटेल, माजी नगराध्यक्ष शंकर बडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर पाटील , मकरंद सोने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी खासदार सुरेश धानोरकर, अ‍ॅड.मोघे, प्रा.पुरके यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने राज्यपालांना उपविभागीय अधिकारी भाग्यश्री सातपुते यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन दिले.

टॅग्स :congressकाँग्रेस