शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

उपसंचालकावर कारवाईची मागणी

By admin | Updated: April 18, 2015 02:15 IST

प्राथमिक शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्या वर्तनाची चौकशी करून त्यांनी केलेल्या नियमबाह्य वसुलीमुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

वणी : प्राथमिक शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्या वर्तनाची चौकशी करून त्यांनी केलेल्या नियमबाह्य वसुलीमुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष आशा टोंगे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे केली आहे.अमरावती विभागातील नगरपरिषद प्राथमिक शाळांना अनुदान देणे व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी शिक्षण उपसंचालकांची आहे. शिक्षण उपसंचालक नगरपरिषदेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करून त्यामार्फत नगरपरिषदेच्या अनुदानावर, तसेच शाळांतील प्रशासनावर देखरेख ठेवतात. मात्र येथील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भागासाठी एकस्तर पदोन्नती व भत्ता सन २००२ पासून नियमबाह्यपणे देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत तत्कालीन उपसंचालकांनी ६० हप्त्यांमध्ये वसुलीचे आदेश दिले होते. तथापि अद्याप सेवापुस्तिकेत नोंदी नाही व कमी रक्कम वसूल करण्यात येत आहे. ३० दिवसांपेक्षा जादा दिवसांच्या सुटीतील नक्षलग्रस्त भत्ता काढण्यात आला व अंकेक्षण आक्षेपानंतरही तो वसूल करण्यात आला नाही. येथील नगरपरिषद ही ‘ब’ वर्ग नगरपरिषद असल्यामुळे शिक्षण विभाग वेतनावर ९० टक्के अनुदान देते. उर्वरित १० टक्के वेतनासाठी नगरपरिषदेचा धोरणात्मक ठराव आवश्यक असतो. तथापि नगरपरिषदेचा ठराव न घेताच घरभाडे भत्ता, मेडिकल रिअबर्समेंट पूर्णपणे नगरपरिषद फंडातून चौधरी व कासावार यांच्ना देण्यात आला, असा आरोपही टोंगे यांनी केला आहे.गोलेलवार, सोनटक्के, बरशेट्टीवार, कुमरे, भांडारवार, चिंचोलकर, घुगुल, तिवार, पाटील, पोद्दार आदी सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापकांना सेवा ज्येष्ठतेनुसार १०० टक्के निवडश्रेणी देण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांबाबत नगरपरिषदेचा कोणताही ठराव नाही. त्यांनी सिनिअर स्केलनंतर १२ वर्षांची सेवा केलेली नाही. निवडश्रेणी केवळ २० टक्के कर्मचाऱ्यांना देय असताना १०० टक्के कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी देण्यात आली. त्यांना पेंशनही सुरू आहे. मुख्याध्यापकांचे पद नसताना लांडे, अफजल खॉ हे सेवानिवृत्त होऊन ते मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीत पेंशन घेत आहे. त्यामुळे पवार हे अकार्यक्षम व शिक्षण उपसंचालक पदासाठी लायक अधिकारी नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पवार यांना प्रत्यक्ष भेटून व लिखित पत्राद्वारे जाणीव करून देऊनही तयांनी दखल न घेतल्यामुळे त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आशा टोंगे, स्विकृत सदस्य पी.के.टोंगे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)