दिग्रसच्या विकासासाठी कटीबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:13 IST2018-05-16T00:13:13+5:302018-05-16T00:13:13+5:30
तालुक्यात विकासाचे नियोजन करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण नेहमी कृतीवर भर देत आलो असून संपूर्ण दिग्रस मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

दिग्रसच्या विकासासाठी कटीबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यात विकासाचे नियोजन करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण नेहमी कृतीवर भर देत आलो असून संपूर्ण दिग्रस मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
दिग्रस येथे ७११ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ होत्या. त्या म्हणाल्या, बायांनी आपली संस्कृती जपली आहे, हे पुरुषांनी विसरु नये, तिच्या कामाचे एकदा तरी कौतुक करीत जा, असा सल्ला देत सिंधूतार्इंनी संजय राठोड यांना हे तुमच्या कष्टाचे फळ आहे, या मतदारसंघाला तुमच्या रुपाने कर्तृत्वान नेता लाभला आहे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. विठ्ठल काटेवाले यांनी केले. यावेळी राज्य सफाई आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, नगराध्यक्ष सदफजहा मो. जावेद, उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, जिल्हा परिषद सदस्य अतिश राठोड, डॉ. रुख्मिणी उकंडे, पंचायत समिती सदस्य अनिता राठोड, दीपाली लाखाडे, सुलोचना कांबळे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, अरविंद गादेवार, नगरसेवक डॉ. संदीप दुधे, केतन रत्नपारखी, बाळू जाधव, नूर महंमद खान, सै.अक्रम सै. उमर, सुभाष अटल, किशोर साबू, वैशाली दुधे, ज्योत्स्ना काळे, खुर्शिदबानो शे. मुतुर्जा उपस्थित होते.