शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

घसरलेली तूर पोहोचली ५२०० रूपयांवर

By admin | Updated: January 17, 2017 01:20 IST

काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली.

यवतमाळ : काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली. तुरीला अधिक दर मिळावे म्हणून मार्केटिंग फेडरेशनने खुल्या बाजारात बोली लावण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे दर सुधारण्याची शक्यता आहे. गतवर्षी १० ते ११ हजार रूपये क्विंटलपर्यंत असलेली तूर हंगाम सुरू होण्यापूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आली होती. यामध्ये क्विंटलमागे ७,२०० रूपयांची घट नोंदविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सोमवारी बाजारातील तुरीचे दर वधारले. ४,२०० ते ५,२०० रूपये क्विंटलपर्यंत बोली लागली. यामध्ये क्विंटलमागे एक हजाराची वाढ नोंदविली गेली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हे दर निम्मेच आहे. त्यामध्ये पाच हजार रूपयांची घट आहे. जागतिक बाजारात भारतीय तुरीची असलेली मागणी आणि निर्यातबंदीने भारतात तुरीचे दर घसरले आहेत. निर्यातबंदी उठविल्यास दर वाढतील. त्यादृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. परंतु अद्याप कुठल्याही हालचाली नाही.महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-आॅपरेटिव मार्केटिंग फेडरेशनच्या मदतीने जिल्ह्यात सात केंद्र उघडण्यात आले आहेत. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव, आर्णी, पुसद, दिग्रस आणि कळंंबचा समावेश आहे. (शहर वार्ताहर)खुल्या बाजारात बोलीतुरीचे दर आधारभूत दर खाली गेल्याने हमी केंद्र उघडण्यात आले. सध्या एकाच जागेवर खरेदीची परवानगी आहे. तुरीचे दर आधारभूत किमतीच्या वर गेले आहेत. या स्थितीत स्पर्धा निर्माण होऊन अधिक दर मिळावे म्हणून आधारभूत केंद्रांना खुल्या बाजारात बोली लावण्याची परवानगी हवी आहे.