यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेत सेल्फीच्या नादात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:42 IST2018-09-20T13:41:57+5:302018-09-20T13:42:35+5:30

झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला.

Death of two people drowning in Selfy in Penganga river, Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेत सेल्फीच्या नादात बुडून दोघांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेत सेल्फीच्या नादात बुडून दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देमोहर्रमसाठी आले होते युवक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरू आहे.
मोहर्रमसाठी हे पाचही जण येथे आले होते. बुधवारी ते पैनगंगेत स्नासासाठी गेले असता, नावेत बसून सेल्फी काढण्याची त्यांना इच्छा झाली. नदीच्या मध्यभागी जाऊन सेल्फी काढताना त्यांचा तोल जाऊन नाव उलटली व सर्व युवक पाण्यात बुडाले. या अपघातात शेख अर्षद (१४), शेख सुफीर सिराज (१६) या दोघांचा मृत्यू झाला. सय्यद उमेद (१८) हा गंभीर आहे. या पाच जणांपैकी दोघांनी पोहत किनारा गाठला.

Web Title: Death of two people drowning in Selfy in Penganga river, Yavatmal district