शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१४ तालुक्यात नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षणच नाही

By admin | Updated: April 18, 2015 02:10 IST

अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

यवतमाळ : अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले. मात्र शासकीय यंत्रणेने अद्याप १४ तालुक्यात नुकसानीच्या सर्वेक्षणाला प्रारंभही केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नित्याचाच झाला आहे. उन्हाळा की पावसाळा हे समजणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यात रोजच कोण्या ना कोण्या तालुक्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. वादळ, वारा, विजा यामुळे नुकसानही तेवढेच मोठे होते आहे. आधीच दुष्काळात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. कृषी, महसूल यंत्रणेकडून हे सर्वेक्षण अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ११ व १२ एप्रिलला पडलेल्या अवकाळी पावसाचे केवळ बाभूळगाव व महागाव या दोनच तालुक्यातील सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाले आहे. बाभूळगाव तालुक्यात १५३ तर महागाव तालुक्यात ६१ हेक्टर क्षेत्रात नुकसान दाखविले गेले आहे. उर्वरित १४ तालुक्यात अद्याप सर्वेक्षणच सुरू झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथे नुकसान किती याचा शासकीय आकडा शोधणे कठीण झाले आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात संत्रा, आंबा, भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र सर्वेक्षण झालेल्या दोन तालुक्यात केवळ एक हेक्टरमधील आंब्याला नुकसान झाल्याचा उफराटा अहवाल दिला गेला आहे. दोन तालुक्यांमिळून २१४ हेक्टरमध्ये नुकसान दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात उमरखेड, दिग्रस, दारव्हा, कळंब, आर्णी, झरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला असून पिकांचे नुकसानही तेवढेच मोठे आहे. भाजीपाला पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आजही अवकाळी पाऊस सुरू असून नुकसानही होतच आहे. मात्र त्यानंतरही १४ तालुक्यांमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही. (शहर वार्ताहर)